‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ वा हंगाम दोन वर्षांनंतर भारतात यशस्वीपणे खेळला जात आहे. या हंगामात आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी छाप पाडली. यात युवा मार्को यान्सेनचाही समावेश आहे. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळलेला मार्को यान्सेन यंदा सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेचा भविष्यातील उत्तम खेळाडू म्हणूनही पाहिले जाते.
मार्कोवर बोली लावत मुंबईने सर्वांना केले चकित
गेल्यावर्षी लिलावाच्या अगदी शेवटी शेवटी ‘मार्को यान्सेन’ हे नाव लिलाव करणाऱ्या हूय एडमड यांनी उच्चारले. काही क्षण कोणत्याही संघाने ‘बॅटन’ उचलला नाही. मात्र, गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून बोली लावणाऱ्या झहीर खानने अचानकपणे त्याच्यावर बोली लावली. झहीर खानच्या या पावलामुळे उपस्थित अवाक झाले. कारण, या खेळाडूबद्दल कोणालाही माहीत नव्हते. इतर कोणीही बोली न लावल्याने मार्को जेन्सन २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला.
जेन्सन अवघ्या २० लाख रुपयात संघाचा भाग झाल्याचा आनंद मुंबईसाठी बोली लावणाऱ्या झहीर खान, राहुल संघवी व इतरांना इतका आनंद झाला की, ग्लेन मॅक्सवेल व ख्रिस मॉरिस यांना करोडोंमध्ये खरेदी केल्यावर आरसीबी व राजस्थान रॉयल्सच्या संघांना झाला नव्हता. मुंबईसाठी बोली लावणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना टाळ्या देत हा आनंद साजरा केला होता.
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे मार्को
मार्को यान्सेन हा दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्लर्क्सडोर्प येथील त्याचा जन्म. सध्या २२ वर्षाच्या असलेल्या मार्कोबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे की, तो आणि त्याचा जुळा भाऊ डूआन हे दोघेही क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आहे. नॉर्थ वेस्ट प्रोवियन्ससाठी दोघे भाऊ क्रिकेट खेळतात.
ही आहेत मार्कोची वैशिष्ट्ये
तो निरंतर १४० किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो. तसेच, आठव्या-नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठ-मोठे फटके मारण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. या सर्वात त्याच्या बाजूने जाणारी गोष्ट म्हणजे तो तब्बल ६ फूट ८ इतक्या उंचीचा आहे.
भारतात येऊन गेला आहे मार्को
मार्को यान्सेनने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी देखील केली होती. मार्को २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा १९ वर्षाखालील संघासोबत भारत दौऱ्यावर देखील येऊन गेला आहे. त्याने डिसेंबर २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेही भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामन्यातून. त्यानंतर याचवर्षी जानेवारीमध्ये त्याने भारताविरुद्ध वनडे पदार्पणही केले.
मार्कोची आतापर्यंतची आकडेवारी
मार्कोच्या आत्तापर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचे झाल्यास तो फक्त २३ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. ज्यामध्ये ७५१ धावा व ९० बळी त्याने आपल्या नावे केले आहेत. मार्को टी२० चे १९ सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याला १५ बळी घेण्यात यश लाभले. तर, १६ लिस्ट ए सामन्यात त्याने १९ बळी आपल्या नावे केले आहेत. तसेच त्याने ५ कसोटी सामन्यात २८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर २ वनडेत २ बळी घेतले आहेत.
आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये ८ सामने खेळले असून ८ विकेट्स घेतल्या आहेत. हाच मार्को आज (१ मे) त्याचा २२ वा वाढदिवस साजरा साजरा करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानकडून आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या फलंदाजांमध्ये बटलरच आहे ‘बॉस’, रहाणेलाही पछाडलं
‘तो’ झेल लखनऊसाठी होता खूपच महत्वाचा, पकडल्यानंतर कृणालने एकदा नाही, तर दोनदा केले किस