राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. हंगामात त्याने आतापर्यंत तीन शतके ठोकली आहेत आणि सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध शनिवारी (३० एप्रिल) डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर बटलरने राजस्थानसाठी महत्वाच्या धावा केल्या, पण यादरम्यान त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
आयपीलएच्या या १५व्या हंगामात जोस बटलर (Jos Buttler) पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानचा चालू हंगामातील हा दुसरा सामना होता, ज्यामध्ये बटलरने ६७ धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी त्याला ५२ चेंडू खेळवे लागले, यामध्ये त्याने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. त्याच्या धावंच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १५८ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
असे असले, तरीही बटरलने केलेली ही खेळी संघासाठी किफायतशीर ठरली, असे म्हणणे थोटे कठीणच आहे. अर्धशतक करण्यासाठी त्याला तब्बल ४८ चेंडू खेळावे लागले. आयपीएल २०२२ मधील हे सर्वात संथगतीने केले गेलेले अर्धशतक ठरले. चालू आयपीएल हंगामात अर्धशतक करण्यासाठी बटरपेक्षा जास्त चेंडू कोणत्याच खेळाडूला लागले नाहीत.
याआधी ही नकोशी कामगिरी विराट कोहलीच्या नावावर नोंदवली गेली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी दुपारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटने ४५ चेंडूत ५० धावा केल्या. विराटने दुपारी हा नकोसा विक्रम केली आणि त्याच दिवशी रात्री बटलरने हा विक्रम मोडला देखील.
मात्र, बटरलचे चालू हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ५६६ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२ची ऑरेंज कॅप सध्या त्याच्याकडेच आहे. लीग स्टेजचे अजून पाच सामने खेळले जाणार आहेत आणि यादरम्यान तो अजून अनेक विक्रम नावावर करू शकतो.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. चालू हंगामात सुरुवातीच आठ सामन्यात लागोपाठ पराभव पत्करल्यानंतर मुंबईला पहिले यश मिळाले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मुंबईला सूर गवसलाच! राजस्थानच्या ‘रॉयल्स’ला ५ विकेट्सने धूळ चारत साकारला हंगामातील पहिला विजय
‘किंग खान’ थेट अमेरिकेत बांधणार वर्ल्ड क्लास क्रिकेट स्टेडिअम; एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
‘गावसकर, कपिल देव यांच्यानंतर आता पुढचा लिजेंड तोच’, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायले राहुलचे गुणगान