सध्या कोरोना व्हायरस जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे या व्हायरसशी लढा देण्यासाठी भारतात क्रिकेट जगतातून मदतीचा हात पुढे येत आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांंची मदत केली आहे. तसेच इतर काही प्रमुख खेळाडूंनीही मोठी रक्कम देऊ केली आहे.
काहींनी तर चक्क आपला पगार देण्याची घोषणा केली आहे. तर काहींनी उपचार यंत्र दिले आहेत. इतकेच नव्हे तर बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) ५० लाख रुपयांंचे तांदुळ गरजू व्यक्तींना वाटण्याची घोषणा केली होती.
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने या व्हायरसविरुद्ध लढ्यात पुण्यातील मुकुल माधव फाऊंडेशन (Mukul Madhav Foundation) या संस्थेला १ लाख रुपयांची मदत केली आहे. परंतु, धोनीचे चाहते त्याच्याशी नाराज असल्याचे पहायला मिळाले.
धोनीने फक्त १ लाख रुपयांची मदत केल्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल (Troll) करण्यात आले होते. परंतु आता धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनीने (Sakshi Singh Dhoni) यावर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपले मत मांंडले आहे.
यावेळी साक्षीने ट्वीट करत धोनीबद्दलच्या सर्व बातम्यांबद्दल म्हणाली की, “मी मीडिया हाऊसला विनंती करते की अशा संवेदनशील मुद्द्यांवर चूकीच्या बातम्या पसरविणे बंद करा. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मला आश्चर्य वाटते की एक जबाबदार पत्रकारिता गायब होत चालली आहे.”
https://twitter.com/SaakshiSRawat/status/1243460747197206528
सध्या माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की धोनीने केवळ १ लाख रुपयांची मदत केली आहे. परंतु धोनीने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus), १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. परंतु, यामुळे लाखो दैनंदिन मजुरांचे काम पूर्ण ठप्प झाले आहे. देशात ७०० पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-४ खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवले होते, आता थेट रस्त्यावर उतरुन करताय लोकांची मदत






