भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक स्थरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारतातील क्रिकेटपटूंव्यतिरिक्त परदेशी खेळाडूंनी धोनीबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. स्मिथने आज (१६ ऑगस्ट) इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे की ‘शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन धोनी. मला नेहमीच कौतुक असलेला तू एक कठिण प्रतिस्पर्धी आणि खेळाडू होता. पुण्यामध्ये काही वर्षे तूझ्याबरोबर खेळण्याचा आणि तूला थोडेफार जाणून घेण्याचा मला आनंद आहे. तू खरा जंटलमन आहेस आणि तूला शुभेच्छा.’
https://www.instagram.com/p/CD8HTJoJbFJ/
धोनी आणि स्मिथ २०१६ आणि २०१७ च्या आयपीएल हंगामात रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून एकत्र खेळले. या २ हंगामात स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी होती. त्यामुळे रायझिंग पुणे सुपरजायंट्स हा संघ या २ हंगामादरम्यान आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. यावेळी २०१७ च्या हंगामात स्मिथच्या नेतृत्वाखालीही धोनी खेळला होता. या दोन हंगादरम्यान धोनी आणि स्मिथमध्ये चांगली मैत्री झाल्याचे दिसून आले होते.
नंतर २०१८ दरम्यान चेन्नई आणि राजस्थान संघांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यावर धोनीला त्याचा आधीचा संघ चेन्नई सुपर किंग्सने आणि स्मिथला त्याचा आधीचा संघ राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात कायम केले.






