पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाच्या खेळाडूंची मानधन यादी जाहीर केली आहे. या खेळाडूंना त्यांचे मानधन (honorarium) पीसीबी (PCB) त्यांच्या कामगिरीच्या आधारे देते. पीसीबीने खेळाडूंचे विभाजन ए, बी, सी, डी आणि ई या ५ श्रेणींमध्ये केले आहे.
यामध्ये ए श्रेणीतील खेळाडूंना एका वर्षाला ४८ लाख रुपये, बी श्रेणीतील खेळाडूंना एका वर्षाला ३० लाख रुपये आणि सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला २१ लाख रुपये दिले जातील. तर डी श्रेणी आणि ई श्रेणीतील खेळाडूंना एका वर्षाला प्रत्येकी १२ लाख रुपये दिले जातील.
ए श्रेणी-
पाकिस्तानमध्ये ए श्रेणीतील ६ खेळाडूंना एका वर्षाला प्रत्येकी ४८ लाख रुपये मानधन दिले जाते. म्हणजेच या श्रेणीतील खेळाडूंचा एकूण पगार हा जवळपास २.८८ कोटी रुपये आहे.
भारतीय क्रिकेट संघटना ए प्लस श्रेणीतील क्रिकेटपटूंना ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी प्रत्येकी ७ कोटी रुपये देणार आहे. त ए श्रेणीतील भारतीय क्रिकेटपटूंना याच कालावधीसाठी ५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
बी श्रेणी-
बी श्रेणीतील ६ खेळाडूंना वर्षाला प्रत्येकी ३० लाख रुपये मिळतात. म्हणजेच या श्रेणीतील खेळाडूंचा पगार एकूण १.८० करोड रूपये आहे. ब श्रेणीतील भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआय प्रत्येकी ३ कोटी रुपये देते.
सी श्रेणी-
सी ग्रेडमध्ये ९ खेळाडूंंचा समावेश आहे. या खेळाडूंना वर्षाला प्रत्येकी २१ लाख रुपयांचे मानधन दिले जाते. म्हणजेच या खेळाडूंचा एकूण पगार १.८९ कोटी रुपये आहे. सी श्रेणीतील क्रिकेटपटूंना बीसीसीआय वर्षाला प्रत्येकी १ कोटी रुपये देते.
डी श्रेणी-
डी श्रेणीतील ५ खेळाडूंना प्रत्येकी एका वर्षाला १२ लाख रूपये मिळतात. म्हणजेच या श्रेणीतील खेळाडूंचा पगार हा जवळपास ६० लाख रुपये आहे.
ई श्रेणी-
पाकिस्तानच्या ई श्रेणीतील ६ खेळाडूंना एका वर्षाला प्रत्येकी ६ लाख रुपयांंचे मानधन दिले जाते. म्हणजेच या श्रेणीतील खेळाडूंचा एकूण पगार हा ३६ लाख रुपये आहे.
भारतीय संघाचा कर्णधार (Indian Captain) विराट कोहलीला (Virat Kohli) एका वर्षाला मिळणारे मानधन पाहिले, तर त्याला एका वर्षाला जवळपास ७ कोटींपेक्षा अधिक रुपये मिळतात. तर पाकिस्तानच्या ए, बी, सी, डी आणि ई श्रेणीतील खेळाडूंचे एकूण मानधन भारतीय रुपयांमध्ये केवळ ७ कोटी ५३ लाख रुपये आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच
-कारण आले समोर, रोहितला २०११ विश्वचषकात यामुळे मिळाले नव्हते स्थान
-थेट चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी वापरणार ऑस्ट्रेलिया टीम