भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नेहमीच विरोधी संघाच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले आहे. परंतु खेळपट्टीव्यतिरिक्त विराटने उत्पन्नाच्या बाबतीतही सर्वांना मागे टाकले आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे.
विराट क्रिकेटव्यतिरिक्त इतर कोणत्या माध्यमातून पैसे कमावतो याचा आपण या लेखात आढावा घेणार आहोत.
कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) भारतीय संघाच्या अ श्रेणी गटातील खेळाडूंमध्ये समावेश होतो. त्यासाठी त्याला वर्षाला जवळपास ७ कोटी रुपये मानधन मिळते. तसेच त्याला तब्बल १७ कोटी रुपये आयपीएलमधून एका हंगामाचे मिळतात.
परंतु विराटची खरे उत्पन्न हे क्रिकेटमधून येणाऱ्या उत्पन्नापेक्षाही जरा जास्तच आहे.
भारतातील खेळ प्रायोजकांच्या अहवालानुसार, विराट कोहली तब्बल १९ ब्रँड्सचा ब्रँड एँबेसेडर आहे. यासाठी वर्षाला त्याला १५० कोटी रुपये मिळतात.
यामुळेच विराट भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक रुपये कमावणारा खेळाडू बनला आहे. केवळ क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही खेळातील खेळाडूंच्या तुलनेत विराट उत्पन्नाच्या बाबतीत सर्वांमध्ये पुढे आहे. यामध्ये काही शंका नाही की, विराटला आपल्या उत्पन्नापैकी एक मोठा हिस्सा हा जाहिरातींमधून मिळतो. यामध्ये प्यूमा, एमआरएफ, पामोलिव्ह, ऑडी, टीसोट, मान्यवर मोहे, ओकले यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त विराट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरूनदेखील खूप कमाई करतो. विराट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रमोशनल पोस्टसाठी १.२० लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये तब्बल ८२ लाख रुपयांपेक्षा अधिक रुपये घेतो.
विराटच्या उत्पन्नाची माहिती फोर्ब्सने २०१८ साली दिला होता. ज्यामध्ये विराटचे नाव जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील करण्यात आले होते. या यादीत विराटला ८३वे स्थान देण्यात आले होते. त्यावेळी विराट हा भारताचा पहिला असा खेळाडू होता ज्याने फोर्ब्सच्या टॉप १०० जणांच्या यादीत आपले नाव सामील केले होते.
फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने २०१८मध्ये जवळपास १६१ कोटी रुपयांची कमाई केली होती. ज्यामध्ये २७ कोटी रुपये हे त्याचा क्रिकेटचा पगार आहे. तर उर्वरित १३४ कोटी रुपये विराटला जाहिरातींमधून मिळाले होते.
इतकेच नव्हे तर मागील वर्षी २०१९मध्ये फोर्ब्स इंडियाच्या (Forbes India) यादीमध्ये विराटने टॉप १०० जणांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला होता. जर विराटच्या दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर, विराट रोज जवळपास ७० लाख रुपये कमावतो.
फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, विराटची वार्षिक कमाई जवळपास २५२.७२ कोटी रुपये आहे. तसेच फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० सेलिब्रिटींची निवड प्रिंट-सोशल मीडियावरील सेलिब्रिटींचे अंदाजे उत्पन्न आणि लोकप्रियतेनुसार केली जाते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमधून १०० कोटी रुपये कमावणारे ३ खेळाडू





