आगामी बांगलादेशचा भारत दोरा आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी शेवटच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला लोळवले आणि आता बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणाने कसोटी मालिकेपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा त्यांच्याच घरात घुसून पराभव केला होता. बांगलादेशने दोन्ही सामन्यावर वर्चस्व गाजवत पाकिस्तानला धूळ चारली आणि इतिहास रचला. या विजयात बांगलादेशच्या गोलंदाजांचे मोठे योगदान होते. संघाचा युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली. नाहिद राणाने (Nahid Rana) 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
नाहिद राणा म्हणाला, “भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही आमचे प्रशिक्षण सुरू केले आहे. आम्ही जितकी जास्त तयारी करू तितकेच सामन्यांदरम्यान कामगिरी करणे सोपे होईल. भारत हा चांगला संघ आहे. पण त्या दिवशी जो संघ चांगला क्रिकेट खेळेल त्याचा विजय होईल. तिथे जाऊन बघू. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. वेग अशी गोष्ट आहे जी आपण नेहमी सांगू शकत नाही. सर्व काही रिदमवर अवलंबून असते. कधीकधी ते क्लिक होते आणि आपण त्या गतीशी जुळतो. मी संघाच्या योजनेनुसारच गोलंदाजी करतो.”
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
कृणाल पंड्याच्या घरी पूजेला दिसला नाही हार्दिक, नताशासोबत घटस्फोटानंतर भावांमध्ये वाढले मतभेद?
बेन स्टोक्सचे, पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
लिंबू टिंबू गोलंदाजापुढेही बाबर आझम फ्लॉप! सराव सामन्यात केवळ 20 धावांवर बाद