---Advertisement---

क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य! विलियम्सनची नक्कल करताना दिसला चिमुकला, Video Viral

Kane-Williamson
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवर गोलंदाजांचे पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा संघ स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर त्यांचा कर्णधार केन विलियम्सन नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्यावेळी विलियम्सनच्या मागे एक लहान मुलगा त्याचे हुबेहूब अनुकरण करताना दिसला.

इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ 1st Test) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लॉर्ड्सची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल दिवशी. न्यूझीलंडचा पहिला डाव संपून इंग्लंडचा अर्धा संघ पहिल्या दिवशी तंबूत गेला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १३२ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या, तर इंग्लंडने देखील दिवसाचा खेळ संपेपर्यंत अवघ्या ११६ धावांवर त्यांच्या ७ विकेट्स गमावल्या.

पहिल्या डावात काही खास कामगिरी करू न शकलेला केन विलियम्सन (Kane Williamson) नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिवसा. त्यावेळी त्याच्या मागे एक लहान मुलगा आला आणि त्याची नक्कल करू लागला. विलियम्सनच्या या चाहत्याचे नाव ‘टॉम’ असे सांगितेल गेले आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सने मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. या दोघांनी पहिल्या डावात प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडचा स्वतात गुंडाळले. असे असले, तरी इंग्लंडला देखील पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली नाही.

प्रशिक्षक आणि कर्णधार बदलल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाकडून चाहत्यांना चांगल्या प्रदर्शनाची आपेक्षा होती, पण पहिल्या डावात ते अवघ्या १४१ धावा करून सर्वबाद झाले. पहिल्या डावात त्यांनी अवघ्या ९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील न्यूझीलंडला गळती लागली होती, पण त्यांना वेळेत स्वतःला सावरले. अवघ्या ५६ धावांवर  त्यांनी ४ विकेट्स गमावल्या होत्या, पण त्यानंतर डॅरेल मिचेल आणि टॉम ब्लंडेल यांनी संघाचा डाव सांभाळला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ४ विकेट्सच्या नुकसानावर २३६ धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकी कर्णधार पाहतोय मोठी स्वप्ने; म्हणे, आयपीएलमध्ये खेळायचंय, तेही कर्णधार म्हणून

आयपीएल जिंकल्यानंतर पंड्याला मिळाली कायमस्वरूपी जपावी अशी भेट, Photo केला शेअर

मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---