पदार्पणातच चमकदार कामगिरी करणारे खेळाडू खूप कमी असतात. त्या शानदार खेळाडूंमध्ये भारताचा 21 वर्षीय फलंदाज यशस्वी जयसवाल याचाही समावेश झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वीने शतक झळकावले. तसेच, त्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 200हून अधिक धावांची भागीदारीही दिली. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावत 312 धावा केल्या. अशाप्रकारे भारताकडे 143 धावांची आघाडी झाली.
सध्या यशस्वी जयसवाल आणि विराट कोहली (Yashasvi Jaiswal And Virat Kohli) क्रीझवर आहेत. जयसवालने नाबाद 143 धावा, तर विराटने नाबाद 36 धावा केल्या आहेत. तसेच, आता कसोटी पदार्पणातील शतकाविषयी यशस्वी जयसवालने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला जयसवाल?
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) म्हणाला की, “हा माझ्यासाठी खूपच भावनिक डाव आहे. भारतीय संघात स्थान मिळवणे सोपे नाहीये. मात्र, मला संधी मिळाली, त्यासाठी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. खासकरून, संघ व्यवस्थापन, रोहित शर्मा आणि माझ्या चाहत्यांना.” पुढे बोलताना जयसवाल म्हणाला की, “डॉमिनिकाची खेळपट्टी संथ आहे. याव्यतिरिक्त आऊटफील्डही खूपच संथ आहे. हे खूपच कठीण आणि आव्हानात्मक आहे. डॉमिनिकामध्ये खूपच उकाडाही आहे. मात्र, आपल्या देशासाठी मला इथे चांगली कामगिरी करायची होती. मी प्रत्येक चेंडू खेळण्यावर लक्ष केंद्रित करत होतो. तसेच, आपल्या क्रिकेटचीही मजा घेत होतो.”
‘माझ्यासाठी हा खूपच भावूक क्षण’
जयसवालने पुढे बोलताना असेही म्हटले की, “माझे कसोटी क्रिकेटवर प्रेम आहे. आव्हाने आवडतात. खासकरून जेव्हा चेंडू स्विंग आणि वेगात असतो. त्या परिस्थितीत खेळण्याचा मी आनंद घेतला. आम्ही खूप मेहनत केली. माझ्यासाठी हा खूपच भावूक क्षण आहे. मला स्वत:चा अभिमान आहे. मात्र, मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. ही खेळी मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो. माझ्यासाठी ही सुरुवात आहे, पुढील दिवसात मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवेल.”
A special dedication after a special start in international cricket! 😊#TeamIndia | #WIvIND | @ybj_19 pic.twitter.com/Dsiwln3rwt
— BCCI (@BCCI) July 14, 2023
जयसवालचा शतकी तडाखा
या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेला यशस्वी जयसवाल सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिला. त्याने यावेळी तब्बल 350 चेंडूंचा सामना करताना 143 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 14 वेळा चेंडू चौकारासाठी पाठवला. आता तिसऱ्या दिवशी यशस्वी आपली शतकी खेळी द्विशतकात बदलतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (young cricketer yashashvi jaiswal reaction after century in debut test ind vs wi)
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा! यशस्वी-रोहितच्या शानदार शतकानंतर 2 मोठे धक्के, संघाकडे 162 धावांची आघाडी
नाद नाद नादच! विराटकडून सेहवागचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त, ‘त्या’ खास यादीत पटकावला पाचवा क्रमांक