राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. एवढंच नाही, तर संघाचे खेळाडूही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या खेळाडूंमध्ये सामील असलेला सलामीवीर फलंदाज यशस्वी जयसवाल याने आयपीएल 2023च्या 52व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाद पराक्रम केला आहे. यशस्वीने आयपीएलमधील 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. तो अशी कामगिरी करणारा दुसरा सर्वात युवा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने पृथ्वी शॉ याला मागे सोडले आहे. याव्यतिरिक्त तो सर्वात वेगवान 1000 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडूही बनला आहे.
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हैदराबादविरुद्ध 18 चेंडूत 35 धावांची छोटेखानी खेळी साकारली. यावेळी त्याला मार्को यान्सेन (Marco Jansen) याने पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर टी नटराजनच्या हातून झेलबाद केले. मात्र, 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 35 धावा करताच त्याने एक खास विक्रम केला.
यशस्वी जयसवालचा विक्रम
यशस्वीने या खेळीसह सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण केल्या. त्याच्या आता 1024 धावा झाल्या आहेत. यशस्वीने 21 वर्षे आणि 130 दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा युवा फलंदाज बनला आहे. रिषभ पंत याच्या नावावर आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान 1000 धावा करणारा युवा फलंदाज बनण्याचा विक्रम आहे. पंतने 20 वर्षे आणि 218 दिवसांच्या वयात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ आहे. यशस्वीने पृथ्वीला मागे सोडले आहे. विशेष म्हणजे, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 22 वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये 1000 धावा केल्या होत्या.
???? Milestone Alert ????
1⃣0⃣0⃣0⃣ IPL runs & going strong ???? ????
Well done, @ybj_19! ???? ????@rajasthanroyals 34/0 after 3 overs.
Follow the match ???? https://t.co/1EMWKvcgh9#TATAIPL | #RRvSRH pic.twitter.com/tAIxU4cW7T
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात 1000 धावा करणारे भारतीय खेळाडू
रिषभ पंत- 20 वर्षे आणि 218 दिवस
यशस्वी जयसवाल- 21 वर्षे आणि 130 दिवस
पृथ्वी शॉ- 21 वर्षे आणि 169 दिवस
संजू सॅमसन- 21 वर्षे आणि 183 दिवस
शुबमन गिल- 21 वर्षे आणि 222 दिवस
विराट कोहली- 22 वर्षे आणि 175 दिवस
रोहित शर्मा- 22 वर्षे आणि 340 दिवस
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा करणारे भारतीय खेळाडू (डावानुसार)
सचिन तेंडुलकर- 31 डाव
ऋतुराज गायकवाड- 31 डाव
सुरेश रैना- 34 डाव
यशस्वी जयसवाल- 34 डाव
रिषभ पंत- 35 डाव
देवदत्त पडिक्कल- 35 डाव
गौतम गंभीर- 36 डाव
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा करणारे खेळाडू
शॉन मार्श- 21 डाव
लेंडल सिमन्स- 23 डाव
मैथ्यू हेडन- 25 डाव
जॉनी बेअरस्टो- 26 डाव
ख्रिस गेल- 27 डाव (young cricketer yashasvi jaiswal became second youngest batter completes 1000 runs in ipl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
असे 5 खेळाडू, ज्यांनी IPLमध्ये हैदराबादविरुद्ध केल्यात सर्वाधिक धावा; संजू 208 धावांनी विराटच्या पुढे
‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आला अन् साहाला थेट तंबूतच पाठवलं; धुरंधराच्या कॅचचा ‘हा’ व्हिडिओ लगेच पाहा




