कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला आहे. या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनेक खेळाडूंनी आतापर्यंत मदत केली आहे. अशामध्ये आता पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने कोविड-१९ या व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपलेही योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
ईशानने या व्हायरसविरुद्धच्या (Corona Virus) लढाईत ५०००० रुपये देण्याचा (Help of 50000 Rupees) निर्णय घेतला आहे. यामध्ये त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये प्रत्येकी २०००० रुपये तसेच स्थानिक रुग्णालयामध्ये १०००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी ईशान (Ishan Porel) म्हणाला की, “आपल्याला जसे जमेल तसे या भयानक व्हायरसविरुद्ध लढले पाहिजे. मी माझे योगदान देत आहे. मी माझ्या वस्तीतील ज्या लोकांची जेवणाची समस्या निर्माण होत आहे, त्या १०० लोकांना तांदुळ, दाळ यांचे वाटप करत आहे. मी आणि माझे आई-वडीलांनी या लोकांना पाहिले आणि मागील दोन दिवसांपासून या लोकांची मदत करत आहोत.”
याबरोबरच ईशानने लोकांना आपल्या घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. यावेळी तो म्हणाला की, मी टी.व्ही. वर पाहत आहे की, लोक गर्दीमध्ये बाहेर पडत आहेत. त्यांना या गोष्टीचा अंदाज असला पाहिजे की, ते प्रत्येकाचे आयुष्य धोक्यात टाकत आहेत. मी सर्वांना घरात राहण्याचे आणि सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.
या व्हायरसविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयबरोबरच (BCCI) विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे तसेच अनेक क्रिकेटपटूंनी यामध्ये मदतीचा हात दिला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२५ वर्षांनी सौरव गांगुली पुन्हा त्या जागी गेला, केले मोठे दान
-७ बाप-लेकांच्या जोड्या, ज्यांनी गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त झिरो
-धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
-गद्दार म्हणणाऱ्यांना युवराजची सणसणीत चपराक
-डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावणाऱ्या टोनी लुईसचे निधन






