लंडन। आज(14 जूलै) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड दोन्ही संघ त्यांचा पहिला विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.
या विश्वचषकात न्यूझीलंडचे नेतृत्व केन विलियम्सन करत आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व इयान मॉर्गन करत आहे. आज विलियम्सनचे वय 28 वर्षे 340 दिवस असून तो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहेत
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा विश्वविक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. त्यांचे 1983 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 24 वर्षे 170 दिवस वय होते.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. पाँटिंगने 2003 च्या विश्वचषकात 28 वर्षे 94 दिवस एवढे वय असताना ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यात नेतृत्व केले होते.
आज होत असलेल्या 2019 विश्वचषकातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.
तसेच टॉम लॅथमने 47 धावांची, तर विलियम्सनने 30 धावांची महत्त्वपूर्ण छोटीखानी खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेटने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारे सर्वात युवा कर्णधार –
24 वर्षे 170 दिवस – कपिल देव, 1983
28 वर्षे 94 दिवस – रिकी पाँटिंग, 2003
28 वर्षे 340 दिवस – केन विलियम्सन, 2019
29 वर्षे 269 दिवस – एमएस धोनी, 2011
29 वर्षे 336 दिवस – माहेला जयवर्धने, 2007
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–१२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत कर्णधार विलियम्सनने रचला मोठा इतिहास
–विश्वचषक २०१९: हे माहित आहे का? आज मैदानावर उपस्थित असणाऱ्यांपैकी हा एकमेव व्यक्ती आहे विश्वविजेता
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-इंग्लंड सामना टाय झाला तर हा संघ होणार विश्वविजेता…