---Advertisement---

वय छोटे पण पराक्रम मोठे! वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू कामगिरीसह केला ‘हा’ खास विक्रम

On: रविवार, जानेवारी 17, 2021 2:35 PM
---Advertisement---

अष्टपैलू कामगिरी काय असते, याचा प्रत्यय आज (१७ जानेवारी) युवा भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर याने जगाला दिला आहे. या शिलेदाराने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात हातखंडा असलेल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. यासह एकाहून एक जबरदस्त विक्रमांची त्याच्या खात्यात भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर चालू असलेल्या चौथ्या व निर्णायक कसोटी सामन्यात त्याने खास कामगिरी केली आहे.

पदार्पणात ३ विकेट्स आणि ५० पेक्षा जास्त धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर गुंडाळण्यात सुंदरने मोलाचा वाटा दिला होता. यावेळी त्याने ८९ षटके गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा त्याचा पहिला शिकार बनला. तर पुढे कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लायन यांना त्याने त्रिफळाचीत केले.

त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सुंदरने १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. याबरोबरच त्याने शार्दुल ठाकूरसह ७ व्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारीही रचली. अखेर मिचेल स्टार्कने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले.

अशी कामगिरी कसोटीतील युवा भारतीय क्रिकेटपटू-

आशिया आणि अमेरिका खंड सोडून म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या देशातील एका तरी देशात खेळताना कसोटी सामन्यात सर्वात कमी वयात ३ विकेट्स आणि ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारा सुंदर दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. २१ वर्षे आणि २०१ दिवसांच्या वयात त्याने हा खास किर्तीमान मिळवला आहे.

सुंदरपुर्वी माजी भारतीय अष्टपैलू रवी शास्त्री यांनी हा विक्रम नोंदवला होता. जुलै १९८२ साली २० वर्षे आणि ४२ दिवसांचे वय असताना शास्त्री यांनी इंग्लंडविरुद्ध द ओव्हल स्टेडियमवर खेळताना पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि ६६ धावांची खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test : तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा; ऑस्ट्रेलियाकडे ५४ धावांची आघाडी

‘तुला परत मानला रे ठाकूर’, विराट कोहलीचे ‘मुंबईकर’ शार्दुल ठाकूरसाठी खास ट्विट

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शार्दुलचा दे घुमा के! इरफान-अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---