सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(4 जानेवारी) दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 24 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे.
या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने हे शतक 137 चेंडूत पूर्ण केले. पंतने या सामन्यात 189 चेंडूत नाबाद 159 धावा केल्या आहेत. यात खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
त्यामुळे तो कसोटीमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने हा विक्रम वयाच्या 21 वर्षे 91 दिवशी केला आहे.
याआधी हा विक्रम तातेंदा तायबूच्या नावावर होता. त्याने जानेवारी 2005 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात 153 धावांची खेळी केली होती. त्यावेळी तायबूचे वय 21 वर्षे 245 दिवस एवढे होते.
याबरोबरच रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षकही ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे यष्टीरक्षक –
21 वर्षे 91 दिवस – रिषभ पंत (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 2019)
21 वर्षे 245 दिवस – तातेंदा तायबू (बांगलादेश विरुद्ध, 2005)
महत्त्वाच्या बातम्या:
–कांगारुंना त्यांच्याच मातीत चितपट करणारा रिषभ पंत भारतातील पहिलाच विकेटकीपर
–शतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर
–धोनी एवढ क्रिकेट खेळला, परंतु हा विक्रम कधी करताच आला नाही