भारतात अशा अनेक युवा खेळाडूंचा भरणा आहे, ज्यांनी अद्याप राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले नाही. मात्र, हे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट आणि टी20 लीग खेळून नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या खेळाडूंमध्ये 21 वर्षीय डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याच्या नावाचाही समावेश आहे. अशात सुदर्शनविषयी मोठी बातमी समोर येत आहे. त्याे आपल्या कारकीर्दीविषयी मोठा निर्णय घेतला आहे.
साई सुदर्शन (Sai Sudarsan) याने मागील 1 वर्षांपासून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेत तो गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा भाग होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध खेळताना त्याने 47 चेंडूत 96 धावांची झंझावाती खेळी साकारून सर्वांनाच प्रभावित केले होते. आता साई सुदर्शन काऊंटी क्रिकेट (Sai Sudarsan County Cricket) स्पर्धेत खेळणार आहे.
साई सुदर्शनने सरे (Sai Sudarsan Surrey) या काऊंटी संघाकडून खेळणार आहे. त्यांच्यात 3 सामन्यांचा करार झाला आहे. यामध्ये तो 3 सप्टेंबरच्या वॉर्विकशायरविरुद्ध आणि 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर तो अखेरचा सामना 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान हॅम्पशायरविरुद्ध खेळणार आहे. साई सुदर्शनने नुकतेच श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या इमर्जिंग आशिया चषकात भारत अ संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
या स्पर्धेत सुदर्शनने पाकिस्तान ए संघाविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकण्यासोबतच एकूण 220 धावा केल्या होत्या. सुदर्शन देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू (Tamilnadu) संघाकडून खेळतो. सरे संघाचे संचालक ऍलेक स्टीवर्ट यांनी सुदर्शन संघासोबत जोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. मला काही लोकांनी त्याला आपल्या संघात सामील करण्याचा सल्ला दिला होता.”
देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी
साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाकडून खेळताना अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एकूण 8 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 42.71च्या सरासरीने एकूण 598 धावा केल्या आहेत. सुदर्शनकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. लवकरच त्याचे भारतीय संघातही पदार्पण होऊ शकते. (youngster sai sudharsan will be playing for surrey in final 3 matches county championship read)
हेही वाचाच-
पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळणार ‘हे’ 4 भारतीय, 140 कोटी भारतीय पाहतायेत प्लेइंग इलेव्हनची वाट
भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते पथिरानाने अवघ्या 20व्या वयात करून दाखवलं, बांगलादेशविरुद्ध घडला मोठा विक्रम