यामध्ये काहीही शंका नाही की पाकिस्तान संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक यूनिस खान हा उत्कृष्ट फलंदाज होता. यूनिसने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटीत १० हजार पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. परंतु, हा माजी फलंदाज जेवढ्या वेगाने धावा करत होता. तेवढ्याच वेगाने त्याला रागही येतो. पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा याने लोकांना यूनिसच्या रागापासून सावध राहण्याचाही सल्ला दिला होता.
रमीज म्हणाला होता की, यूनिसला खूप लवकर राग येतो. तो त्याच्या रागामुळे फलंदाजी प्रशिक्षकाचे पदही सोडू शकतो. रमीजची ही गोष्ट सत्य असल्याचे दिसून येत आहे. कारण, नुकताच यूनिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यूनिस त्या व्हिडिओमध्ये रागात एका चाहत्याला मैदानावरुन ड्रेसिंग रुममध्ये ओढत नेताना दिसत आहे.
हा जुना व्हिडिओ आहे. ज्यामध्ये यूनिस कराचीमधील मैदानावर सामना खेळताना दिसत आहे. परंतु, तिथे सुरक्षेचा काहीची व्यवस्था नव्हती. त्यामुळे चाहते यूनिसला भेटण्यासाठी मैदानामध्ये घुसतात. दरम्यान एक चाहता यूनिसच्या अंगावर पडला आणि मग इतर चाहत्यांनी यूनिसभोवती गर्दी केली.
या घटनेमुळे यूनिसचा पारा चढला. त्याने आपल्या अंगावर पडलेल्या चाहत्याची कॉलर पकडली आणि त्याला ओढत ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेला. दरम्यान अनेकांनी यूनिसला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही थांबला नाही. शेवटी कसेबसे त्या चाहत्याला यूनिसच्या तावडीतून सोडवण्यात आले. परंतु, रागावलेला यूनिस सामना सोडून निघून गेला.
असे असले तरी, मिस्बाह उल हक हे यूनिसची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यामुळे खूप आनंदी आहेत. त्यांनी म्हटले की, “प्रशिक्षण स्टाफमध्ये यूनिसच्या येण्याने खूप उत्साह वाढलेला दिसत आहे. त्याच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. आम्ही सोबत बरेच सामने खेळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी मधल्या फळीत खेळताना यूनिससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे यूनिस त्यांना नीट समजू शकतो आणि त्यांची खेळण्याची पद्धतही त्याला माहित असणार.”
ट्रेंडिंग घडामोडी-
बाबर आझमला ‘या’ भारतीय खेळाडूबरोबर करायची आहे सलामीला…
आईच्या पोटातच जीवे मारणार होते वडील, आता ओळखला जातो जगात ‘षटकार…
…म्हणून हरभजन सिंगने मागितली देशभरातील डॉक्टरांची माफी