पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक, कर्णधार आणि फलंदाज युनूस खान मंगळवारी (29 नोव्हेंबर ) आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1977 रोजी पाकिस्तानच्या मर्दान शहरात झाला होता. त्यांनी क्रिकेटच्या तीनही स्वरूपात पाकिस्तान संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच त्यांच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद देखील आहे.
युनूस खान हे सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते. त्यांच्या नावे पाकिस्तान संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 10099 धावा केल्या आहेत. तसेच ते कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या 11 देशांत शतक झळकावणारे एकमेव फलंदाज आहेत. असा कारनामा अजुनपर्यंत कुठल्याही फलंदाजाला करता आला नाहीये.
तसेच पाकिस्तान संघासाठी एकाच डावात 300 पेक्षा अधिक धावा करणारे ते तिसरे फलंदाज आहेत. यासह 2009 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत युनूस खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने जेतेपद पटकावले होते.
अशी राहिली आहे कसोटी कारकीर्द
तसेच त्यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 17 वर्ष कसोटी संघासाठी मोलाचे योगदान दिले. या दरम्यान त्यांनी 118 कसोटी सामने खेळले,ज्यामधे त्यांनी 213 डावात 52.00 च्या सरासरीने 10099 धावा केल्या. ज्यामध्ये 34 शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 313 ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.
अशी राहिली आहे वनडे कारकीर्द
त्यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत पाकिस्तान संघासाठी एकूण 265 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 31.2 च्या सरासरीने 7249 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी 7 शतक आणि 48 अर्धशतक झळकावले आहेत. तसेच 144 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.
अशी राहिली आहे आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्द
तसेच त्यांच्या टी20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी 25 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 22.1 च्या सरासरीने 442 धावा केल्या. त्यांनी आपल्या टी20 कारकिर्दीत 2 अर्धशतक झळकावले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला नोकरासारखी वागणूक द्यायचे…’, वसीम अक्रमकडून दिग्गजावर मोठे आरोप
सुपरजायंट्सने निवडला नवा कर्णधार! विजेतेपदासाठी लावणार नव्याने जोर