---Advertisement---

पाकिस्तान संघाला जबर धक्का, टी२० विश्वचषक २०२२पर्यंत करारबद्ध असलेल्या प्रशिक्षकाने घेतली माघार

On: मंगळवार, जून 22, 2021 4:17 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाचे माजी क्रिकेटपटू युनिस खान यांनी २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्यांकडे टी-२० विश्वचषक २०२२ पर्यंत पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद देण्यात आले होते. परंतु त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोठा निर्णय घेतल्यानंतर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

येत्या दोन दिवसात पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटले आहे की, “पाकिस्तान क्रिकेट संघ फलंदाजी प्रशिक्षकाशिवाय इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लवकरच फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल.”

या घोषणेनंतर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, युनिस खान यांनी स्वखुशीने प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ते आपल्या भूमिकेपासून खुश नव्हते. एका सूत्रानुसार, ज्याप्रकारे भविष्यासाठी पाकिस्तान संघाचा पाया रचला जात आहे . त्यावरुन युनिस खान खुश नव्हते.  younis khan stepped down as a batting coach of pakistan cricket team)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी म्हटले की, “युनिससारख्या अनुभवी आणि तज्ञ व्यक्तीचे जाणे दुःखद आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि युनिस खान यांच्यात भरपूर वेळ चर्चा झाल्यानंतर युनिस खान यांनी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.काही काळ पाकिस्तान पुरुष संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही अशी अपेक्षा करतो की, युवा क्रिकेटपटूंना घडविण्यात ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मदत करतील.”

पाकिस्तान संघ येत्या २५ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान संघाला तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर २१ जुलै ते २४ ऑगस्टपर्यंत पाकिस्तान संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान संघाला पाच टी-२० सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शुभमनने सांगितला विराटसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, ‘या’ कारणामुळे होऊ शकलं नाही बोलण

जॉनी बेयरस्टोने निवडला आपला ‘सर्वोत्कृष्ट सार्वकालिन संघ’, केवळ एका भारतीयाला दिली जागा

व्हिडिओ: ६,६,६,६… क्वालिफायर सामन्यात फलंदाजाने विरोधकांना फोडला घाम, मारले ४ खणखणीत षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---