आयपीएल स्पर्धेत आजवर असंख्य असे अफलातून झेल पाहायला मिळत आहेत. परंतु आता ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीगमध्येही असाच एक भन्नाट झेल घेतलेला दिसला आहे. ऍडलेड स्ट्रायकर्सच्या तहलिया मॅकग्रा आणि मॅडी पेन्ना यांनी हा एकत्रित घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला आहे.
शनिवारी (7 नोव्हेंबर) ब्रिस्बेन हीट वुमन्स आणि एडलेड स्ट्रायकर्स वुमन्स यांच्यातील सामन्यात एक भन्नाट झेल पाहायला मिळाला. ऍडलेड स्ट्रायकर्सची फिरकीपटू अमांडा वेलिंग्टनने अमेलिया केरला एक फुल टॉस चेंडू टाकला. तिने हा चेंडू सीमापार पोहोचवण्यासाठी एक फटका खेळला. या फटक्यात फारशी ताकद नसल्याने चेंडू दूर गेला नाही.
परंतु मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जात असताना क्षेत्ररक्षण करीत असलेल्या मॅडी पेन्नाने झेल घेण्यासाठी हात उंचावले. अशात चेंडू हाताला लागून अलगद उंच उडाला आणि त्याचा वेग काहीसा मंदावला. पेन्नाच्या हाताला लागून चेंडू थोडा मागे पडणार इतक्यात जवळच उभ्या असलेल्या तहलिया मॅकग्राने चेंडूवर स्वतःला झोकून देत टप्पा पडण्यापूर्वीच झेल यशस्वीरित्या पूर्ण केला. या अफलातून झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड फिरत आहे. या झेलामुळे एडिलेडच्या संघाने ब्रिस्बेनला 18 धावांनी पराभूत केले.
WHAT. A. CATCH. 😱#BlueEnergy #WBBL06 pic.twitter.com/5u2gvr3QLf
— AdelaideStrikersWBBL (@StrikersWBBL) November 7, 2020
कर्णधार मेगन शट आणि डार्सी ब्राऊनदेखील चमकदार गोलंदाजी करत होते. शटने 1 बळी घेत आपल्या चार षटकांत केवळ 26 धावा दिल्या, तर ब्राउनने त्याच्याही पेक्षा किफायतशीर गोलंदाजी केली. तिने चार षटकांत केवळ 17 धावा देऊन 1 बळी आपल्या नावावर करून घेतला.
ऍडलेडसाठी केटी मॅकच्या 37 चेंडूत 50 धावा आणि लॉरा वोल्वार्डच्या 46 धावांच्या मदतीने संघाला आठ बाद 153 अशी धावसंख्या उभारता आली.
जॉर्जिया रेडमॅन्नेने ब्रिस्बेन हीटला चांगली सुरुवात दिली आणि मॅडी ग्रीनसह पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. रेडमायेनल 65 धावांवर बाद झाल्यानंतर ब्रिस्बेन संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडून गेली.
महत्त्वाच्या बातम्या-
-नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
-तुझं कौतुक करावं तेवढं कमी! रोहित शर्माच्या ‘त्या’ कृत्याला पाहून तुम्हीही असंच म्हणाल
-प्रियम गर्गने हवेत उडी घेत काही सेंकदातच घेतला अप्रतिम झेल; व्हिडिओ व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
-बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार