भारतीय संघाचे लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम श्रीलंकेहून मायदेशी परतले आहेत. अलीकडेच, श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे दोन्ही खेळाडू तिथून संघासह परतू शकले नाहीत. आता दोघेही कोरोनामधून बरे झाल्यानंतर भारतात परतले आहेत. भारतात आल्यावर चहलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक छायाचित्र पोस्ट केले, जेथे त्याने त्याच्या चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दलचे अपडेट दिले आहे.
या दौऱ्यात चहलने दोन एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला होता. या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होता. विशेष म्हणजे, दुसऱ्या टी-२० च्या पूर्वी अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या क्रिकेटपटूंना इतर संघापासून वेगळे केले गेले. यानंतर संघ घरी परतण्याच्या अगदी आधी चहल आणि गौतम पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना श्रीलंकेत विलगीकरणात राहावे लागले होते.
Feels good to be negative with a positive attitude #home thank you for all your wishes ❤️🙏🏻 pic.twitter.com/vECVbcaEim
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 6, 2021
मात्र कृणाल पांड्या चहल आणि गौतमच्या आधीच श्रीलंकेहून परतला आहे. चहलप्रमाणे त्यानेही त्याच्या चाहत्यांना त्याच्या पुनर्प्राप्तीबद्दल कळवण्यासाठी ट्विटरवर एक छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यांनी बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेटचेही (एसएलसी) आभार मानले आहेत. तसेच मदतीसाठी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांचे देखील आभार व्यक्त केले आहेत.
https://www.instagram.com/p/CSO_Y2lqg2k/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारख्या स्टार खेळाडूंशिवाय हा संघ श्रीलंकेला गेला होता. कारण हे सर्व वरिष्ठ क्रिकेटपटू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत धवनच्या नेतृत्त्वाखालील संघाने श्रीलंकेतील वनडे मालिका २-१ ने जिंकली आणि टी-२० मालिका २-१ ने गमावली. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला या दौऱ्यासाठी प्रशिक्षक बनवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
त्या राहुल सारखाच हा राहुल आहे; ‘या’ दिग्गज गोलंदाजाने द्रविडशी केएलची केली तुलना
ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी