---Advertisement---

युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

---Advertisement---

पुणे ।  एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी झालेल्या सामन्यात त्याने क्रोशियाच्या अँटे पाव्हिकचा ६-४, ७-६(४) असा पराभव केला. युकीला या स्पर्धेत तृतीय मानांकन आहे. पहिला सेट युकीने एकतर्फी जिंकला असला तरी दुसऱ्या सेटमध्ये मात्र त्याला चांगलेच झगडावे लागले. ट्रायब्रेकरमध्ये गेलेला दुसरा सेट शेवटी त्याने ७-६(७-४) असा जिंकला. 

याबरोबर त्याने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment