देशांतर्गत क्रिकेट तसेच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) अनेक धमाकेदार खेळ्याकरून नाव कमावणारा बडोद्याचा युवा अष्टपैलू दीपक हुड्डा याने आता बडोदा सोडून इतर राज्यासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो कदाचित राजस्थान संघासाठी क्रिकेट खेळू शकतो, याची स्वतः बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. दीपकने बडोदा क्रिकेट सोडल्यानंतर भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इरफानचा मोठा भाऊ व भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला युसूफ पठाण यानेदेखील या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली आहे.
युसूफ पठाणने दिली प्रतिक्रिया
दीपक हुड्डाने बडोदा संघाचे प्रतिनिधित्व न करण्याचा घेतलेला निर्णय समजल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू व बडोद्याचा माजी कर्णधार युसूफ पठाण याने ट्विटरवर पोस्ट करताना लिहिले, ‘दीपक हुड्डा अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये बडोद्याकडून खेळताना आपली ओळख निर्माण केली. तो एक मॅचविनर असून त्याचे जाणे हे संघासाठी मोठे नुकसान आहे. त्याच्यासारख्या गेम चेंजरचे भविष्य उज्ज्वल असते. मी त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो.’
युसूफआधी इरफान पठाण यानेदेखील दीपक हुड्डाचे दुसरीकडे जाणे बडोदा संघाला परवडणारे नसल्याचे म्हटले होते.
Deepak Hooda was impressive and made a mark in all three domestic formats for Baroda. He was a match winner and his exit will be a big loss for the team. A game changer like him has a bright future ahead. I wish him all the best.
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) July 15, 2021
असा झाला होता वाद
बडोदा क्रिकेट असोसिएशनने गतवर्षी कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा यांच्यात झालेल्या वादविवादानंतर दीपक हुड्डाला अनुशासनात्मक आणि खेळाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविल्याबद्दल दीपकला निलंबित केले होते. हुड्डाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सराव शिबिरातून माघार घेतली होती. हुड्डाने दावा केला होता की, पंड्याने सर्वांसमक्ष आपल्यासोबत गैरवर्तणूक केली तसेच कारकीर्द संपवण्याची धमकी दिली.
दीपक हुड्डाची कारकीर्द
दीपक हुड्डाने २०१४ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने एकूण त्याने ४६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९ शतक आणि १५ अर्धशतकांच्या मदतीने २९०८ धावा केल्या आहेत. यासह ६८ लिस्ट ए सामन्यात त्याने २०५९ धावा केल्या.
तसेच आयपीएलमध्ये त्याने एकूण ७६ सामने खेळले आहेत. यात त्याला ७४१ धावा करण्यात यश आले आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलेला दीपक सध्या पंजाब किंग संघाचा भाग असून, त्यांच्यासाठी तो चमकदार कामगिरी करताना दिसतोय.
महत्त्वाच्या बातम्या –
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतःला रैनाने केला खुलासा
भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलला लागली ऑलिम्पिकची लॉटरी, पुरुष एकेरीत करणार प्रतिनिधित्व