---Advertisement---

भारतीय चाहत्यांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला दिला जाफरचा वॉटरबॉय होण्याचा सल्ला, वाचा सविस्तर प्रकरण

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 7:29 PM
---Advertisement---

भारताचा माजी सलामीवीर व इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हे ट्विटरवर सर्वाधिक सक्रिय असणारे क्रिकेटपटू आहेत. दोघांनाही आपल्या मजेशीर ट्विट्स आणि मीम्ससाठी चांगलेच ओळखले जाते. हे दोघे एकमेकांची मजा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच जाफर याला ओडिशा क्रिकेट संघटनेने आगामी देशांतर्गत हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर, वॉन याने त्याची मजा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर भारतीय चाहत्यांनी वॉन यालाच ट्रोल केले.

चाहत्यांनी केले ट्रोल
नुकतीच वासीम जाफर याची ओडिशा क्रिकेट संघटनेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर, मायकेल वॉन याने त्याची मजा घेण्यासाठी ट्विट करताना लिहिले, ‘त्याला सहाय्यकाची गरज आहे का?’

त्याने गमतीत ही गोष्ट म्हटली असली तरी, भारतीय चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.

एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले, ‘आम्ही भारतीय आहोत. तुम्हाला यासाठी एक वर्ष इंटर्नशिप करावी लागेल.’

https://twitter.com/JRism9/status/1415614300337541120

दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, ‘जाफरकडून ट्रोल झाल्यानंतरही तुमचे पोट भरले नाही का? त्याच्या वॉटर बॉयची जागा घेता का?’

अन्य एका ट्वीटर वापरकर्त्यानी देखील काही मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जाफरची झाली मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
भारतीय संघाचा माजी सलामीवीर असलेल्या वसीम जाफर याची ओडीसा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षासाठी निवड केली गेली आहे. आगामी देशांतर्गत हंगामापासून तो ही जबाबदारी स्वीकारेल. सध्या जाफर आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा फलंदाजी सल्लागार आहे. यापूर्वी, त्याने दोन वर्षे उत्तराखंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक पद देखील सांभाळले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीपेक्षा ‘या’ दिग्गजाला अधिक पाहावी लागली होती शतकाची वाट

भारताविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, ‘या’ २४ खेळाडूंचा मिळाली संधी

‘हार्दिक भविष्यात धोनीसारखा खतरनाक फिनिशर बनेल’; पाहा कोणी व्यक्त केलाय विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---