---Advertisement---

कार धोक्यात आहे! युसूफ पठाणच्या स्फोटक फलंदाजीचा वारसा चालवतोय त्याचा मुलगा, पाहा मजेशीर व्हिडिओ

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 7:09 PM
---Advertisement---

पठाण परिवाराने युसुफ पठाण आणि इरफान पठाण, यांच्या रूपाने भारतीय क्रिकेट संघाला उत्कृष्ट खेळाडू दिले आहेत. इरफान पठाणने भारतीय संघात आपल्या धारदार स्विंग गोलंदाजीने ओळख निर्माण केली होती तर युसुफ पठाण हा आपल्या गगनचुंबी षटकार खेचणारा फलंदाज म्हणून ठसा उमटविला होता. त्यामुळे आता मैदानावर युसुफ आणि इरफान यांची मुले दिसली तर नवल वाटायला नको.

युसुफ पठाणचा मुलगा आयान यानेही आपल्या वडिलांप्रमाणे मोठ-मोठे षटकार ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. आयानने मोठमोठे शॉट खेळण्यासाठी त्याचा चुलता इरफान पठाणला पहिले शिकार बनवले आहे. इरफान पठाणने आयानचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओ मध्ये इरफान पठाण आयानला फलंदाजी करण्यासाठी एका मागून एक चेंडू टाकत आहे. आयान हे चेंडू बघत आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल शॉट लगावत आहे. या दरम्यान तो एक-दोन चेंडू खेळताना हुकत सुद्धा आहे. परंतु बॅटला लागणारा प्रत्येक चेंडू हा बाजूला उभ्या असणाऱ्या कारवर जाऊन आदळत आहे.

https://www.instagram.com/p/CJV2n8Ch1YD/

इरफान पठाणने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले आहे की, “कार संकटात होती.” याव्यतिरिक्त त्याने या व्हिडिओ मध्ये युसुफ पठाण आणि आयान यांना टॅग केले आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ खूप लोकांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पठाण सुद्धा शॉट खेळत असलेल्या आयानचे कौतुक करताना दिसून येत आहे.

लंका प्रीमियर लीग मध्ये घेतला होता भाग

इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. तो आता क्रिकेट समालोचक म्हणून नवीन खेळी खेळत आहे. त्याचबरोबर त्याने श्रीलंका येथे झालेल्या लंका प्रीमियर लीग मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत तो कँडी टस्कर्स संघाकडून खेळताना दिसला होता.

या स्पर्धेत त्याने चार सामन्यात सहभाग घेतला होता. ज्यामध्ये त्याने तीन सामन्यात गोलंदाजी केली होती. त्यापैकी एकाही सामन्यात विकेट प्राप्त करता आली नव्हती. परंतु त्याने तीन डावात फलंदाजी करताना 18, 25* आणि 11 धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---