पुणे – एलिमिनेटरचा दुसरा सामना नाशिक विरुद्ध बीड या सघांत झाला. नाशिक संघ रेलीगेशन मध्ये पहिल्या क्रमांकावर होता तर बीड संघ प्रमोशन फेरीत आठव्या क्रमांकावर राहिला होता. नाशिकच्या पवन भोर ने पहिल्या चढाईत गुण मिळवत संघाचा खात उघडला. ओंकार पोकळे व शिवकुमार बोरगुडे सुद्धा गुण मिळवत चांगली सुरुवात केली. तर बीड कडून राहुल टेके ने जोरदार चढाया करत गुण मिळवले तर संदेश देशमुख ने पकडीत गुण मिळवले. बीड संघाने 8 व्या मिनिटाला नाशिक संघाला ऑल आऊट करत 10-05 अशी आघाडी मिळवली.
मध्यंतरापूर्वी नाशिकच्या पवन भोर ने चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवत सामन्यात चुरस वाढवली. मध्यंतराला बीड संघाकडे 18-13 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर पवन भोर व शिवकुमार बोरगुडे ने गुण मिळवत आपली पिछाडी कमी केली. त्यानंतर नाशिक संघाने बीड संघाला ऑल आऊट करत सामना 20-20 असा बरोबरीत आणला. नाशिक कडून ईश्वर पथाडे ने उत्कृष्ट पकडी केल्या. 7 मिनिटं शिल्लक असताना नाशिक संघाने बीड संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत 29-25 अशी आघाडी मिळवली.
बीड कडून राहुल टेके ने चढाईत तर शुभम गर्जे ने पकडीत गुण मिळवत सामन्यात चुरस वाढवली. शेवटचा 1 मिनिटं शिल्लक असताना 31-29 अशी नाशिक संघाकडे आघाडी होती. बीडच्या शंकर मेघाने ने गुण मिळवत सामना 30-31 अशी पिछाडी कमी केली होती मात्र शंकर मेघाने ची त्याच्या पुढील चढाईत पकड करत नाशिक कडे 2 गुणांची आघाडी आली. शेवटच्या डू और डाय चढाईत नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे ने पूर्ण वेळ वाया घालवत 1 गुण बीड संघाला दिला. नाशिक संघाने 32-31 असा विजय मिळवत पुढील एलिमिनेटर सामन्यासाठी प्रवेश मिळवला. नाशिक कडून पवन भोर ने 10 गुण मिळवले. ईश्वर पथाडे ने पकडीत 5 तर पकडीत प्रविण व्हडगर ने 4 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- पवन भोर, नाशिक
बेस्ट डिफेंडर- शुभम गर्जे, बीड
कबड्डी का कमाल – ईश्वर पथाडे, नाशिक