पुणे – युवा कबड्डी सिरीज मध्ये प्ले-ऑफस मध्ये आज क्वालिफायर 2 सामना पालघर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झाला. प्रमोशन फेरीत पालघर संघ चौथ्या क्रमांकावर तर रत्नागिरी संघ सहाव्या क्रमांकावर होता. दोन्ही संघानी अत्यंत संथ सुरुवात केली होती. दोन्ही संघानी 3 मिनिटांच्या खेळात 1-1 गुण मिळवले होते ते गुण सुद्धा बचावफळीत मिळवले होते. रत्नागिरी संघाकडे 10 मिनिटा नंतर 6-4 अशी आघाडी असताना पालघर संघाने सुपर टॅकल करत सामना 6-6 बरोबरीत आणला. दोन्ही सघांत चांगली चुरस बघायला मिळाली.
रत्नागिरी संघाने अखेर 13 व्या मिनिटाला पालघर संघाला ऑल आऊट जरत 13-08 अशी आघाडी मिळवली होती. रत्नागिरी संघाकडून अमरसिंग कश्यप ने चढाईत तर निलेश शिंदे ने पकडीत महत्वपूर्ण गुण मिळवत संघाची आघाडी वाढवली होती. मध्यंतराला रत्नागिरी संघाकडे 18-12 अशी आघाडी होती. पालघर कडुन प्रेम मंडळ ने जबरदस्त पकडी करत पालघर संघाला सामन्यात टिकवून ठेवले होते. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे व अमरसिंग कश्यप ने उत्कृष्ट खेळ करत संघाची आघाडी वाढवली.
पालघरच्या प्रतिक जाधव ने चपळाई चढाया करत गुण मिळवत संघाची पिछाडी कमी करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. अखेरची पाच मिनिटं शिल्लक असताना पालघर संघाने पलटवार करत रत्नागिरी संघाला ऑल आऊट करत सामना 24-24 असा बरोबरीत आणला होता. त्यानंतर सामना चुरशीचा झाला शेवटच्या चढाईत आधी सामना 27-27 असा बरोबरीत असताना पालघरच्या प्रतिक जाधव ने कमाल रेड 2 गुण मिळवत सामना 29-27 असा जिंकला. प्रतिक जाधवची 10 गुणांची खेळी महत्वपूर्ण ठरली. सुरुवातीला प्रेम मंडळ ने पकडीत 6 गुण मिळवत सामना हाता बाहेर जाऊ दिला नाही.
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- प्रेम मंडळ, पालघर
कबड्डी का कमाल – प्रतिक जाधव, पालघर