टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून यात अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) संधी मिळाली आहे, तर शुबमन गिलला (Shubman gill) मात्र डच्चू देण्यात आला आहे. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) आपल्या मार्गदर्शनाखाली गिल आणि अभिषेकच्या खेळावर खूप मेहनत घेतली होती, ज्याचा त्यांना फायदाही झाला. आता युवीने वर्ल्ड कपपूर्वी आणखी एका स्टार खेळाडूला कोचिंग देण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर युवराज सिंगचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्टार फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) फलंदाजीच्या टिप्स देताना दिसत आहे. युवीने सॅमसनला ‘फ्रंटफुट’ वापरण्याची खास तंत्रे सांगितली. संजूदेखील युवीचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहे. याआधी अभिषेक आणि शुबमनचा खेळ सुधारण्यात युवीचा मोठा वाटा राहिला आहे. आता संजू सॅमसनही त्याच्याकडून धडे गिरवून वर्ल्ड कप गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
Sanju Samson training session with Yuvraj Singh ❤️🔥@YUVSTRONG12 @IamSanjuSamson pic.twitter.com/gBc04dbKXs
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) January 10, 2026
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजूचा संघात समावेश होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र, आता संजूकडे मोठी संधी आहे. तो अभिषेक शर्मासोबत सलामीला (Open) येण्याची शक्यता आहे.
2024 मध्ये संजूने टी-20 मध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने 13 सामन्यांत 39.63 च्या सरासरीने 436 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 180.16 होता. विशेष म्हणजे त्याने या काळात 3 शतके ठोकली होती.






