भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला चाहत्यांपासून क्रिकेट दिग्गजांपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या. परंतु भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने चहलला त्याच्या वाढदिवसादिवशीही ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही.
युवराजने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ट्वीट केले, “मी तुला युझी चहल म्हणू की उंदीर. वजन वाढविण्यासाठी तुला शुभेच्छा. तुझ्या मजेशीर व्हिडिओ आणि कमेंट्सने असंच सर्वांचे मनोरंजन करत राहा. तुला भावी आयुष्याच्या तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” युवराजने या ट्वीटमध्ये उंदराचे आणि हसणाऱ्या इमोजीचा वापरही केला आहे.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1286159972909215746
युवराजच्या (Yuvraj Singh) या ट्वीटला आतापर्यंत ९ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पसंत केले आहे. त्याचबरोबर ५०० पेक्षाही अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चहल (Yuzvendra Chahal) नेहमीच मैदानात असो वा मैदानाबाहेर मजा- मस्करी करण्याची संधी सोडत नसतो. तो आपल्या संघसहकाऱ्यांनाही अनेकदा सोशल मीडियामार्फत ट्रोल करतो. परंतु यावेळी युवराजने ही संधी सोडली नाही आणि चहलला ट्रोल करत अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू, आज आहे…
-भारतासाठी आलेल्या मोठ्या गुड न्यूजमुळे पाकिस्तानच्या अख्तरचे दुखले पोट
-तब्बल १२ दिवस चालूनही ड्रॉ राहिलेला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा कसोटी सामना





