आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही कारणांमुळे क्रिकेटपटूंना एकमेकांची टिका करताना क्वचितच पाहायला मिळते. परंतु, भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने चक्क भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलबाबत जातिवाचक विधान केले होते. रोहित शर्मासोबत झालेल्या इंस्टाग्राम लाइव्ह चॅटदरम्यान हा प्रकार घडला. त्यावेळी युवराज चहलच्या टिकटॉकवरील व्हिडिओंबाबत बोलत होता. Yuvraj Singh Apologises Yuzvendra Chahal For His Statement
युवराज म्हणाला की, “या ….. लोकांना काही काम नाही. युझीलाच (युझवेंद्र चहल) बघा. त्याने टिकटॉकवर कसले व्हिडिओ टाकले आहेत.” युवराजच्या या जातिवाचक विधानामुळे चहलचे चाहते भलतेच संतापले आणि त्यांनी सोशल मीडियाद्वारे युवराजवर टिका करण्यास सुरुवात केली. बरेच दिवस ट्विटरवर हॅशटॅग युवराज क्षमा मागचा (Yuvraj Singh Apologise) ट्रेंड चालू होता. पण युवराजला या गोष्टीची कसलीही चिंता नव्हती.
झी न्यूजमध्ये देण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, दलित हक्क कार्यकर्ते आणि वकील रजत कळसन (Rajat Kalsan) यांनी हिसार पोलिस स्टेशनमध्ये युवराजविरुद्ध एफआयआर दाखल केले. शिवाय, युवराजच्या या वक्तव्यावर भारताच्या सलामीवीर फलंदाजाने नाराजी दाखवली नाही, असे म्हणत त्यांनी रोहितवरही निशाना साधला. या एफआयआरनंतर युवराजने चहलच्या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आणि चहलची क्षमा मागितली.
युवराज म्हणाला, “मी समजू शकतो. बोलताना माझ्या तोंडून नकळत असे वक्तव्य केले गेले. एक जबाबदार भारतीय नागरिकाच्या रुपात मी सर्वांची क्षमा मागतो. जर माझ्याकडून नकळत कुणाच्या भावनांना ठेस पोहोचली असेल. तर मला या गोष्टीची खंत आहे.”
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1268810700429897728?s=20
“मी कसल्याही प्रकारची असमानता, जातिभेद, वर्णद्वेष आणि लिंगभेद मानत नाही. मी माझे जीवन लोकांची सेवा करण्यात घालवले आहे. मी सर्वांचा आदर करतो”, असेही पुढे बोलताना युवराज म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
कर्णधार कोहलीला डिवचणं जडेजाला पडलं भलतंच महागात, कोहलीनेही चांगलाच…
२४ हजार धावा केलेला खेळाडू म्हणतोय; आता जर खेळत असतो, तर टीम इंडियात…
विचार पण करु नका, पाकिस्तानच्या ‘त्या’ खेळाडूच्या विराट ५…