भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. युवराजने ऑक्टोबर २००३ मध्ये केनियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने शेतकऱ्यांचे समर्थन केल आहे. याव्यतिरिक्त त्याने आपले वडील योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानासाठी माफी मागितली आहे. सोबतच आनंद साजरा करणार नसल्याचेही म्हटले आहे.
ट्विटरवर पोस्ट करत युवराजने म्हटले की, “नक्कीच शेतकरी हा देशाचा जीव आहे आणि मला वाटते की शांतपणे चर्चा करून समस्येवर उपाय काढता येऊ शकतो.”
त्याने पुढे लिहिले की, “वाढदिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याची एक संधी असते. त्यामुळे या वाढदिवशी मी आनंद साजरा करण्याऐवजी केवळ हे मागतो आणि प्रार्थना करतो की, आपले शेतकरी आणि सरकारमधील सुरू असलेल्या चर्चेवर लवकरात लवकर उपाय निघावा.”
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 11, 2020
“मी माझे वडील योगराज सिंग यांच्या वक्तव्यामुळे दु:खी आणि निराश आहे. मला स्पष्ट करायचे आहे की, त्यांचे वक्तव्य हे वैयक्तिक आहे आणि कोणत्याही प्रकारे माझे विचार त्यांच्यासारखे नाहीत.”
सोमवारी (७ डिसेंबर) योगराज सिंग यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यास म्हटले होते. यावेळी त्यांनी खेळाडूंचे समर्थ केले होते. सोबतच त्यांनी हिंदू लोकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, “शेतकरी योग्य मागणी करत आहेत. सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. आता वेळ आली आहे की, सरकारला यावर उपाय काढायला पाहिजे आणि मी त्या खेळाडूंचे समर्थन करतो, ज्यांनी आपले अवॉर्ड परत केले आहेत.”
हिंदूंबद्दल बोलताना त्यांनी म्हटले होते की, “हे हिंदू गद्दार आहेत. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली आहे.” याव्यतिरिक्त त्यांनी महिलांबद्दलही वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा त्यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर
कसं काय, हार्दिक भाऊ? पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
बुमराहने कमालच केली! अर्धशतक ठोकल्यानंतर मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’, Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
ब्रॅडमन यांचा ‘तो’ विक्रम आपल्या मराठमोळ्या भाऊसाहेब निंबाळकरांनी तेव्हाच मोडला असता, पण…
…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश