पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाईट वक्तव्य करून आपल्यावरच संकट ओढावून घेतले आहे. आफ्रिदी ज्या भारतीय क्रिकेटपटूंना म्हणजेच युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना आपला मित्र समजत होता, आता त्यांनी आफ्रिदीशी असलेले सर्व मैत्रीचे संबंध तोडले आहेत.
गौतम गंभीर (Gautam Gambhir), हरभजननंतर आता भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजनेदेखील (Yuvraj Singh) आफ्रिदीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तो म्हणाला की, त्याने मानवतेच्या नात्याने आफ्रिदीची मदत केली होती. परंतु आता तो असे कधीच करणार नाही.
युवराजने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आफ्रिदीला प्रत्युत्तर देत ट्वीट केले की, “आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून मी खूप नाराज आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी भारतीय संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे मी अशाप्रकारच्या शब्दांचा स्विकार करू शकत नाही. मी मानवतेच्या नात्याने मदतीचे आवाहन केले होते. परंतु आता पुन्हा असे करणार नाही.”
Really disappointed by @SAfridiOfficial‘s comments on our Hon’b PM @narendramodi ji. As a responsible Indian who has played for the country, I will never accept such words. I made an appeal on your behest for the sake of humanity. But never again.
Jai Hind 🇮🇳
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 17, 2020
हरभजन (Harbhajan Singh) आणि युवराजने कोरोना व्हायरसविरुद्ध (Corona Virus) लढण्यासाठी आफ्रिदीच्या फाऊंडेशनमध्ये मदत करण्याचे आवाहन लोकांना केले होते. यानंतर आपल्याच देशातील लोकांच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागला होता.
हरभजननेही आफ्रिदीला (Shahid Afridi) चांगलेच फटकारत म्हटले होते की, “आफ्रिदीने आमचे पंतप्रधान मोदी आणि देशाबद्दल वाईट बोलले आहे, हे सहनशीलतेच्या बाहेरचे आहे. त्याने आपली मर्यादा ओलांडली आहे. यानंतर आमचे आफ्रिदीशी कोणत्याही प्रकारचे नाते नाही. मी संपूर्ण भारताला वचन देतो की मी त्यांच्यासाठी पुन्हा काहीही करणार नाही. आफ्रिदीला इतरांचा आदर कसा करावा हे शिकावे लागेल.”
आफ्रिदीने पंतप्रधान मोदींविरुद्ध (PM Narendra Modi) म्हटले होते की, “कोरोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदींच्या हृदयात आणि डोक्यात आहे. तसेच तो आजार म्हणजे धर्माचा आजार आहे. त्या आजारासाठी मोदी राजकारण करत आहेत. ते आमच्या काश्मीरच्या भाऊ-बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ करत आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला इशारा, आमचा एक तुमच्या सव्वालाखाबरोबर आहे
-या खेळाडूने बाॅर्डर पलिकडे भारताला मिळवुन दिला होता पहिला विजय
-संपुर्ण यादी- भारतीय संघाचे आजपर्यंतचे वनडे कर्णधार व त्यांचे विक्रम