भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वक्तव्य करणे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला भलतेच महागात पडले आहे. त्याच्या वक्तव्यामुळे आफ्रिदीवर सर्वांनी निशाना साधला आहे. त्याला सोशल मीडियावरून टीकांचा सामना करावा लागत आहे.
भारतीय संघाचे क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh), युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी आफ्रिदीला प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता सलामीवीर फलंदाज शिखर धवननेही (Shikhar Dhawan) आफ्रिदीला चांगलेच फटकारले आहे.
धवनने आफ्रिदीला (Shahid Afridi) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटले की, “सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसविरुद्ध (Corona Virus) लढा देत आहे. अशा परिस्थितीतही तू काश्मीरबद्दल बोलत आहेस. काश्मीर आमचे होते, आमचे आहे आणि आमचेच राहणार. तू २२ कोटी लोक जरी आणले ना तरी आमचा एक व्यक्ती सव्वा लाखांबरोबर आहे. बाकीची संख्या तुझी तुच मोज.”
https://twitter.com/SDhawan25/status/1262024869723570178
यापूर्वी गंभीरने म्हटले होते की, “पाकिस्तानकडे ७ लाख सैनिक आहेत. त्यांचे समर्थन करण्यासाठी २० कोटी लोक आहेत. असे मत आहे १६ वर्षीय आफ्रिदीचे. तरीही ते काश्मीरसाठी मागील ७० वर्षांपासून भीक मागत आहेत. आफ्रिदी, इम्रान आणि बाजवा यांसारखे जोकर भारत आणि पंतप्रधानाविरुद्ध वाईट गोष्टी बोलतात. परंतु पाकिस्तानच्या लोकांसाठी काश्मीरला शेवटच्या दिवसापर्यंत घेता येणार नाही. बांगलादेश आठवते ना?”
https://twitter.com/GautamGambhir/status/1261910845224652802
खरंतर आफ्रिदीने पंतप्रधान मोदींविरुद्ध (PM Narendra Modi) म्हटले होते की, “कोरोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदींच्या हृदयात आणि डोक्यात आहे. तसेच तो आजार म्हणजे धर्माचा आजार आहे. त्या आजारासाठी मोदी राजकारण करत आहेत. ते आमच्या काश्मीरच्या भाऊ-बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ करत आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-या खेळाडूने बाॅर्डर पलिकडे भारताला मिळवुन दिला होता पहिला विजय
-संपुर्ण यादी- भारतीय संघाचे आजपर्यंतचे वनडे कर्णधार व त्यांचे विक्रम