टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यानं नुकतंच एक असं वक्तव्य केलं, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. उथप्पानं दावा केला की, विराट कोहली कर्णधार असताना त्यानं युवराज सिंगचं करिअर संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उथप्पाच्या मते, कोहलीनं फिटनेसचा हवाला देत युवराज सिंगचा संघात परतीचा रस्ता बंद केला.
भारताला 2011 विश्वचषक जिंकून देण्यात युवराज सिंगचं योगदान महत्त्वाचं होतं. यानंतर कर्करोगासारख्या आजारावर मात करून तो मैदानावर परतला. मात्र त्याला फिटनेसचा हवाला देऊन टीममधून बाहेर करण्यात आलं. उथप्पाच्या मते, युवराजनं फुफ्फुसाची क्षमता कमी झाली असली तरी भारतीय संघात कमबॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता.
रॉबिन उथप्पानं दावा केला की, युवराज सिंगनं फिटनेस टेस्ट मध्ये केवळ दोन अंकांची सवलत मागितली होती, मात्र कोहलीनं ती नाकारली. त्यानं टेस्ट पास केली आणि संघात जागा देखील बनवली, परंतु एक स्पर्धा खराब गेल्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. उथप्पा म्हणाला, “युवराज सिंग तो खेळाडू आहे, ज्यानं आपल्याला विश्वचषक जिंकवून दिला. त्यानं कॅन्सर सारख्या आजारावर मात करून कमबॅक केला. मात्र कोहलीनं त्याला फिटनेसच्या बाबतीत कोणतीही सूट दिली नाही.”
रॉबिन उथप्पा पुढे म्हणाला की, युवराज सोबत झालेली ही वागणूक त्याच्या करिअरसाठी घातक ठरली. एक स्पर्धा खराब गेल्यानंतर त्याला कमबॅकची संधी देण्यात आली नाही. उथप्पाच्या मते, जेव्हा विराट कोहली कर्णधार बनला, तेव्हा त्यानं युवराजला तसा सपोर्ट दिला नाही, ज्याची त्याला आवश्यकता होती.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी का मिळावी? जाणून घ्या मोठी कारणे
SA20: 28 वर्षीय खेळाडूचा पहिल्याच सामन्यात जलवा, मलिंगा-बुमराच्या खास क्लबमध्ये प्रवेश
‘अनादरपूर्ण वागणूक आणि अपमान…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया