भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. तो फलंदाजीमध्ये जेवढा आक्रमक होता तेवढाच आक्रमक विरोधी संघातील खेळाडूंसोबत वाद घालतानाही दिसायाचा. त्याने अनेकदा मैदानावर खेळताना विदेशी खेळाडूंसोबत वाद घातला आहे. विशेषत: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदी आणि कामरान अकमल यांच्याशी त्याचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले. सध्या त्याच्या तापट स्वभाव पुन्हा चर्चेत आला आहे. याचे कारण गंभीर ने सोशल मीडियावर केलेली पोस्ट आणि युवराज सिंगने त्याच्यावर केले कमेंट आहे.
भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने गंभीरने केलेल्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. कमेंटमध्ये लिहिले की, त्याने अनेकदा गंभीरला वाद घालण्यापासून आडवले आहे.
गौतम गंभीरने मंगळवारी(१४ सप्टेंबर) त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये युवराज सिंगने गंभीरचा स्वेटर पकडला आहे आणि त्याला मागे ओढत आहे. गंभीरने शेअर केलेल्या फोटोसोबत मजेदार कॅप्शन लिहिले आहे की, “देवाचे आभार की, आमच्या चेहऱ्यांवर हास्य आहे. नाहीतर लोकांनी विचार केला असता की, तू मला भांडण करण्यापासून आडवत आहे.” गंभीरची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडलेली दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CTysFSrgcQ5/
गंभीरने त्याच्या पोस्टमध्ये युवराजचा उल्लेख केला असून त्याला यामध्ये टॅगही केले आहे. यानंतर युवराजने त्याच्या या पोस्टवर मजेदार कमेंटही केली आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, “मला नेहमीच तुला भांडण करण्यापासून आडवावे लागत होते.” गंभीरने अनेकदा पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत मैदान वाद घातला आहे. त्याचा हा स्वभाव निवृत्तीनंतरही पाहायला मिळतो, सोशल मीडियावर त्याच्यात आणि शाहिद अफ्रिदीमध्ये नेहमीच खडाजंगी होताना दिसते.
दरम्यान, युवराज आणि गंभीरने भारतीय संघासाठी टी२० आणि वनडे विश्वचषक जिंकण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. गंभीरने भारतीय संघासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी २० सामने खेळले आहेत. गंभीर आता दिल्लीत खासदार आहे आणि तो लवकरच दिल्लीमध्ये एक १० संघांच्या क्रिकेट टूर्नामेंंटचे आयोजन करणार आहे.
या टूर्नामेंंटचे नाव ईस्ट दिल्ली क्रिकेट लीग असे असून यामध्ये दिल्लीतील संघ सामील होतील. तसेच त्याने यमुना स्पोर्ट्स काॅम्प्लेक्सला विश्वचषक स्टेडियम बनवण्याचीही घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चिंटू ते बबलू, तुमच्या लाडक्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रेसिंग रुममध्ये आहेत ‘ही’ टोपण नावं
फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास ‘प्लेईंग इलेव्हन’