सोमवारी (१२ ऑक्टोबर) अबू धाबीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. दरम्यान बेंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने ४ षटकात फक्त १२ धावा देत दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. त्यानंतर माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने चहलची मजेशीर शब्दात प्रशंसा केली.
सामना झाल्यानंतर चहलने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संघाचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “एकटा खेळाडू जास्त विशेष कामगिरी करु शकत नाही. त्यासाठी पूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागते”.
चहलच्या या ट्विटवर युवराजने प्रतिक्रिया देत लिहिले की, “तू कुणालाही जास्त मोठे शॉट मारु देत नाहीयेस! मला मैदानावर पुनरागमन करावं लागेल असं वाटतंय! टॉप क्लास गोलंदाजी युझी!”
महत्त्वाचे म्हणजे, २०१९ साली युवराजने मुंबई इंडियन्सकडून खेळताना चहलच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार मारले होते.
Tu kisi ko nahi marne de raha ! Lagta hai maidan par vapas aana padega 😜! Great spell Yuzi top class 👊🏽
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 13, 2020
कोलकाताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर बेंगलोरने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकत त्यांनी हा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींचे गजब ट्विट, निवृत्त झालेल्या ‘त्या’ क्रिकेटरला म्हणतायत कमबॅक कर
“डिविलियर्सने मारलेला चेंडू जपून ठेव”, आसीबीचे भन्नाट ट्वीट
गुपीत आले समोर! अश्विनने जर्सीचा नंबर अचानक केला होता ९९९ वरून ९९, जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू