शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ चा अंतिम सामना २१ मार्च रोजी पार पडला. या सामन्यात भारत लिजेंड्स आणि श्रीलंका लिजेंड्स हे संघ आमने सामने होते. अटीतटीच्या या सामन्यात भारतीय लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सला १४ धावांनी पराभूत केले. यानंतर हॉटेल स्टाफने विजयाचा जल्लोष साजरा करताना भारतीय संघाचे जंगी स्वागत केले. त्यावेळचा, एक व्हिडिओ युवराज सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात पुन्हा एकदा युवराजची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने ४१ चेंडूत ४ चौकार ४ षटकारांचा मदतीने ६० धावांची खेळी केली. सामना जिंकल्यानंतर युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय लिजेंड्स संघाचे हॉटेल स्टाफतर्फे जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी युवराज बाहुबली चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला त्याने “मोडका बाहुबली” असे विनोदी कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CMsay5PjzV0/?utm_source=ig_web_button_share_sheet
असा झाला रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा अंतिम सामना
श्रीलंकन लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत भारतीय संघाने २० षटक अखेर १८१ धावांचा डोंगर उभा केला होता. सचिन आणि सेहवागची जोडी लवकर माघारी परतली होती. त्यानंतर युवराज आणि युसुफ पठाणच्या जोडीने मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. युवराजने ६० धावांची खेळी केली. तर युसुफने ६२ धावांची खेळी केली. १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघाला १६७ धावाच करता आल्या. परिणामत: हा सामना भारतीय लिजेंड्सने १४ धावांनी जिंकत रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ चे जेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
मिस्टर ॲन्ड मिसेस चहल, टीम इंडियातील ‘प्रसिद्ध’ जोडप्याचे पुण्यात आगमन; व्हिडिओ व्हायरल
कृणाल पंड्याचे पदार्पण, तर मार्क वुडचे पुनरागमन; ‘असा’ असेल पहिल्या वनडेसाठी भारत-इंग्लंड संघ
विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’