शुक्रवारी (४ फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिवस (world cancer day) साजरा केला जात आहे. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग (yuvraj singh) यानेही एकेकाळी कर्करोगाशी झुंज दिली होती. त्यावर मात करून सध्या तो सुखरूप आहे. कर्करोगामुळे युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम मात्र नक्कीच झाला होता. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने युवराजने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची आई बोलताना दिसते.
युवराज कर्करोगावर उपचार घेत असताना त्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची आई शबनम सिंग (shabnam singh) होती. या काळात शबनम यांनी युवराजची सर्व काळजी घेतली आणि त्याला या गंभीर आजारावर मात करण्याची ताकद दिली. शबनम यांनी व्हिडिओत सांगितले आहे की, कर्करोगाच्या उपचारादरम्यान काय काय घडले होते. शबनम यांनी त्या व्यक्तिंसाठी महत्वाच्या सुचना केल्या आहेत, जे एका कर्करोगाच्या रुग्णाची काळजी घेत आहेत. त्यांच्या मते रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती मजबूत असणे गरजेचे असते.
व्हिडिओची सुरुवात २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून होते. युवराज सिंग २०११ विश्वचषकात मालिकावीर ठरला होता आणि रवी शास्त्रींनी या पुरस्काराची घोषणा करताना युवराजचे कौतुक केले होते. व्हिडिओच्या सुरुवातीला युवराज सिंगने लिहिले की, “यामध्ये काहीच शंका नाही की, हा प्रवास अवघड होता. परंतु तुमची काळजी घेणाऱ्यांचे प्रेम आणि पाठिंबा तुम्हाला खूप मजबूत बनवतो. त्यामुळे तुम्हाला खराब दिवसांसोबत लढण्यासाठी मदत मिळते. या जागतिक कर्करोग दिवसाच्या निमित्ताने माझी काळजी घेणाऱ्या शबनम सिंग यांचे आभार मानतो.”
https://www.instagram.com/p/CZipA3Jqli0/
शबनम यांनी संपूर्ण व्हिडिओत युवराजच्या कर्करोगावरील उपचाराची माहिती दिली. व्हिडिओत सांगितल्यानुसार, त्यांनी प्रत्येक पावलावर युवराजची साथ दिली आणि कधिच त्याला कमजोर पडू दिले नाही. जर त्यांना कधी रडू आले, तरी त्या लपून आणि एकांतात रडत असायच्या. त्यांच्या मते काळजी घेणाऱ्यांनी कधिच रुग्णाच्या समोर रडले नाही पाहिजे.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी खेळाडूंचा नादखुळा! झेल तर सोडलाच नंतर एकमेकांना दिली जबर धडक – व्हिडिओ