कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शनिवारी (10 डिसेंबर) तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. तिसऱ्या सामन्यात या स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी करत आलेल्या मोरोक्कोने ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला 1-0 असे पराभूत करत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला. आपला अखेरचा विश्वचषक खेळत असलेल्या रोनाल्डोच्या डोळ्यात या पराभवानंतर अश्रू दिसत होते. त्याचा असा चेहरा पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग भावूक झाला.
क्लब फुटबॉलमध्ये अनेक स्पर्धा तसेच पोर्तुगालसाठी युरो कप जिंकणारा रोनाल्डो आपल्या कारकिर्दीत विश्वचषक जिंकू शकला नाही. मोरोक्कोविरूद्ध सामन्यानंतर तो रडत असतानाची अनेक छायाचित्रे व्हायरल झाली होती. त्याला असे रडताना पाहून अनेक चाहत्यांचे हृदय भरून आले. भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू युवराज सिंग हादेखील निराश दिसला.
Sorry cr7 !! It was heartbreaking to see you cry 😢! Another great upset after Brazil , Portugal goes out ! Congratulations to 🇲🇦 Morocco played out of your skins !!! #portugalvsMorocco #FIFAWorldCup2022 @Cristiano
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 10, 2022
युवराजने ट्विट करत लिहिले,
‘सॉरी सीआर 7! तुला रडताना पाहून मन नाराज झाले. ब्राझीलनंतर आणखी एक उलटफेर, पोर्तुगाल बाहेर. मोरोक्को संघाचे अभिनंदन.’
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अल थुमामा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को सामन्यात पोर्तुगाल संघाला विजयाचे दावेदार मानले जात होते. सलग दुसऱ्या सामन्यात पोर्तुगाल संघाच्या मॅनेजरने अनुभवी ख्रिस्टियानो रोनाल्डो याला बाकावर बसवले. असे असले तरी पोर्तुगाल संघ आक्रमक खेळ दाखवत होता. पहिल्या हाफच्या अखेरीकडे खेळ चालला असतानाच, युसेफ एन नेसरी याने 42 व्या मिनिटाला गोल करत मोरोक्कोला आघाडीवर नेले. दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालने रोनाल्डो याला देखील मैदानात उतरवले. तसेच, अखेरच्या दहा मिनिटात मोरोक्को संघ दहा खेळाडूंसह खेळला. तरीही, पोर्तुगाल संघ बरोबरी साधण्यात अपयशी ठरला. या विजयासह मोरोक्को फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला आफ्रिकन संघ बनला.
(Yuvraj Singh Emotional Tweet After Seein Crying Ronaldo)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
ज्याच्या विक्रमाची केली बरोबरी, त्याच्याकडूनच मिळाली दाद; मॅक्युलमसमोर स्टोक्सचा नाद खुळा पराक्रम