---Advertisement---

लाडू तुझ्यासोबत खेळून खूप छान वाटले, तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा.! -युवराज सिंग

On: शनिवार, जून 7, 2025 7:19 PM
---Advertisement---

भारतीय खेळाडू पियुष चावलाने (indian Cricketer piyush chawla) 6 जून रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. चावलाने त्यांच्या 20 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये खूप मोठे मोठे कारणामे केले. आता त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय दिग्गज युवराज सिंगने (Yuvraj Singh) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोठी मोठी आठवणीत राहणाऱ्या खेळींबद्दल मत व्यक्त केले आणि त्याला लाडू म्हणून देखील संबोधले. पियुष चावला आत्ता सुद्धा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणारा चौथा गोलंदाज आहे.

युवराजने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या जीवनात खूप खेळाडू बघितले. पण पियुष चावला सारखी दृढता त्यांनी कुठेच पाहिली नाही. त्या आठवणी जाग्या केल्या. जेव्हा पियुष चावलाने 17 वर्षांच्या वयामध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते आणि पुढे जाऊन भारतीय क्रिकेटमध्ये दोन वर्ल्ड कप जिंकले.

युवराजने पियुष चावला असे कौतुक करत पुढे म्हटले, तू तुझ्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. मला माहिती आहे की, तू तुझ्या करिअरमध्ये खूप यश सन्मान मिळवला आहे. लाडू तुझ्यासोबत खेळून खूप छान वाटले तुझ्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---