भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग देशात वाढत असलेल्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपले पूर्ण योगदान देत आहे. तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देशातील जनतेला सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. याव्यतिरिक्त त्याने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये ५० लाख रुपयांची मदत दिली होती.
युवराजने (Yuvraj Singh) आता पुन्हा एकदा आपले योगदान दिले आहे. त्याने दिल्ली प्रशासनाला १५००० एन९५ मास्क दिले आहेत. जेणेकरून कोरोना बाधितांना त्याची मदत होईल.
त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “देशातील डॉक्टर्स कोविड-१९ विरुद्ध सुरु असलेल्या लढाईतील खरे हीरो आहेत. मी आणि आमची संस्था युवीकॅन दिल्ली प्रशासनाला १५हजार एन९५ मास्क पाठवत आहोत.”
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1251450604561428482
युवराजच्या या मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्याची प्रशंसा केली आहे. तसेच धन्यवादही दिला आहे.
केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “युवराज तुझ्या या योगदानामुळे दिल्ली प्रशासन आभारी आहे. कॅन्सरसारख्या रोगावर तुझी मात ही या काळात एक प्रेरणा आहे. आपण सर्वजण मिळून कोरोना व्हायरसला (Corona Virus) नक्कीच हरवूया.”
Yuvraj ji, Delhi is very grateful to you for this generous contribution. Your remarkable victory over cancer is an inspiration, especially in these times. Together, we shall overcome. https://t.co/5qNf3lWJz6
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 18, 2020
युवराज व्यतिरिक्त भारतीय संघाचे इतरही खेळाडूंनी आपले योगदान दिले होते. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, हरभजन सिंग, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा यांसारख्या खेळाडूंनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान दिले होते. तसेच क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळातील खेळाडूंनीही यामध्ये आपापल्या परीने मदत दिली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन
-भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आजारी, लाॅकडाऊनमुळे मिळाली नाही या राज्यात एंट्री
-भारताचे ३ महान अष्टपैलू, ज्यांनी विकेट व धावा घेऊन दिलेत सामने जिंकून