भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग लवकरच पुन्हा एकदा मैदानावर क्रिकेट खेळताना दिसणार आहे. टी-20 क्रिकेटमधील धडाकेबाज खेळाडूंपैकी एक युवराज सिंग दुबईमध्ये अल्टीमेट क्रिकेट चॅलेंज (यूकेसी) स्पर्धेत खेळताना दिसेल. या स्पर्धेत युवराज शिवाय, राशीद खान, केविन पीटरसन, इयान मॉर्गन, आणि आंद्रे रसेल आपला जलवा दाखवताना दिसतील.
यूकेसी स्पर्धेत दिसणार क्रिकेटचे नवीन स्वरुप
या स्पर्धेत 16 सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यात दोन यूकेसी दावेदार सामील होतील. इथे एका खेळाडूचा सामना दुसर्या खेळाडू सोबत होईल. सामन्यात 15 चेंडूचे 4 डाव असतील. या स्पर्धेत सामना जिंकण्यासाठी 2 गुण मिळतील. सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू विजयी होईल. या स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिले चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
फलंदाजी करता वेळी कंटेडरला धावा प्राप्त करण्यासाठी धावावे लागेल. धावफलक 6 गटात विभागले जातील. यामध्ये अ गटात 1 धाव, ब गटात 1 धाव, क गटात 2 धावा, ड गटात 3 धावा, इ गटात 4 धावा आणि ई गटात 6 धावा असतील. जर फलंदाज गोलंदाजाच्या मागून हिट करतोय तर त्याला 12 धावा मिळतील आणि त्याचबरोबर 1 अतिरिक्त चेंडू मिळेल. प्रत्येक फलंदाजाच्या बाद होण्यानंतर 5 धावा कपात केल्या जातील.
पुन्हा एकदा सहा षटकार मारायचे आहेत
युवराजने क्रिकेटच्या या नव्या प्रकाराचे स्वागत करताना म्हणाला, “यूकेसी क्रिकेटचे भविष्य आहे आणि प्रेक्षकांमध्ये खुप लोकप्रिय होईल. क्रिकेट प्रत्येक भारतीयांच्या हृदयात बसले आहे. परंतू वेळेसोबत यामध्ये काही नावीन्य आणणे आवश्यक आहे. नवीन प्रकार खुप छान आहे. ज्यामध्ये एका खेळाडूचा सामना दुसर्या खेळाडू सोबत होईल.”
मैदानावर पुनरागमन करत असलेला युवराज यूकेसीला घेवून खुप उत्साहित आहे. त्याने दावा केला आहे की ही स्पर्धा प्रेक्षकांमध्ये खुप लोकप्रिय होईल. युवराज म्हणाला,” मी जगातील कोणत्याही आव्हानाचा सामना करायला तयार आहे.” त्याने आशा व्यक्त केली की यूकेसीच्या या स्पर्धेत 2007 च्या विश्वकप प्रमाणे एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– उडता कोहली! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल
– दक्षिण आफ्रिका संघावर मोठे संकट; तब्बल १० खेळाडू कोरोनाच्या विळख्यात






