शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात बेंगलोर संघाने २ विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स याने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु या धाकड फलंदाजाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवल्याने माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग याने नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत युवराजने लिहिले आहे की, ‘एबी डिविलियर्सला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय समजण्यापलीकडे होता. सलामीवीर बाद झाल्यानंतर तुमच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांने तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे. कमीत कमी टी२० स्वरुपात तर असेच व्हायला हवे.’
पहिल्या आयपीएल सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने ‘मिस्टर ३६०’ डिविलियर्सला मधल्या फळीत फलंदाजीस पाठवले होते. मुंबईच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघ १३ व्या षटकापर्यंत ३ बाद ९८ धावा अशा स्थितीत होता. यावेळी पाचव्या स्थानावर फलंदाजीला येत डिविलियर्सने संघाला मजबूत स्थितीत आणले.
Don’t understand @ABdeVilliers17 batting at no 5 !!? 🤷♂️your best batsmen after opening have to come at no 3 or no 4 in t20 just an opinion #MIvRCB #IPL2021
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 9, 2021
डिविलियर्सने अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी करताना २७ चेंडूत ४८ धावा चोपल्या. दरम्यान त्याने २ षटकार आणि ४ चौकारही मारले. मात्र १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. मुंबईचा यष्टीरक्षक इशान किशन आणि कृणाल पंड्या यांनी मिळून त्याला धावबाद केले. मात्र हर्षल पटेलने पुढे संघाला सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’