---Advertisement---

‘सिक्सर किंग’ युवराज मैदानावर परतणार! ‘या’ स्पर्धेत होणार सहभागी 

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 6:42 PM
---Advertisement---

सैयद अली मुश्ताक चषकची सुरुवात 10 जानेवारी पासून होणार आहे. या स्पर्धेसाठी युवराज सिंगला पंजाबच्या संभाव्य 30 सदस्याच्या यादीत स्थान दिले आहे. युवराज सिंगने 2019 साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु पुन्हा त्याने क्रिकेटमध्ये सहभाग घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे षटकार किंग युवराज सिंग पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेल.

युवराज म्हणाला होता की, तो पंजाबसाठी घरगुती क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. या सर्व 30 खेळाडूंसाठी लुधियाना येथे 18 डिसेंबर पासून सराव सत्राचे आयोजन केले जाईल. नुकतेच काही दिवसांपूर्वी युवराजने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामधे तो फलंदाजीचा सराव करत असल्याचा दिसत आहे. युवी हा भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.

युवराजच्या जोरावर भारताने 28 वर्षानी विश्वचषक जिंकला
युवराज सिंगच्या जोरावर भारतीय संघाने 28 वर्षानंतर 2011 साली वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते, या स्पर्धेतील मालिकावीर हा पुरस्कार देवून त्याचा गौरव करण्यात आला होता. युवराजने भारतीय संघासाठी 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 टी-20 सामने खेळला आहे. त्याने कसोटीत 1900, वनडेत 8701 आणि टी-20 मध्ये 1177 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने कॅनडात झालेल्या जागतिक टी-20 लीग मध्ये भाग घेतला होता. परंतु त्याने निवृत्ती जाहीर करताना सांगितले होते की, तो आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही, त्यामुळे 2020 मध्ये यूएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेत भाग घेतला नव्हता.
39 वर्षीय युवराज सिंगला पीसीएच्या पुनित बालीने निवृत्तीनंतर ही पुनरागमन करण्याची अपिल केली होती. कारण तो संघातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करू शकेल. पीसीएच्या पुनित बालीचे ऐकून युवराज सिंगने बीसीसीआय आणि सौरव गांगुली कडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:
– अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार इतके कसोटी सामने
तो परत येतोय! मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून श्रीसंत पुनरागमन करण्याची शक्यता
– युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---