---Advertisement---

युगांडाच्या गोलंदाजाची अंडर-१९ विश्वचषकात मंकडिंग अन् पेटला विवाद, युवराज-शम्सी आमने सामने

Mankading-In-u19
---Advertisement---

क्रिकेटमध्ये मंकडिंगचा विवाद (Mankading) नवा नाही. गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच जर फलंदाज क्रिजच्या पुढे जात असेल आणि गोलंदाजाने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला मंकडिंग असे म्हटले जाते. सध्या वेस्ट इंडिजमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील युगांडा विरुद्ध पापुआ न्यू गिनी (Uganda vs Papua New Guinea) संघात झालेल्या सामन्यात युगांडाच्या गोलंदाजाने नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेल्या फलंदाजाला मंडकिंगद्वारे बाद केले आहे. यानंतर क्रिकेट दिग्गजांमध्ये या मुद्द्यावरून नवा वाद छेडला गेला आहे. 

काय आहे प्रकरण?
तर झाले असे की, शुक्रवारी (२८ जानेवारी) युगांडा विरुद्ध पापुआ न्यू गिनी संघांमध्ये १३ व्या स्थानासाठी प्लेऑफ सामना झाला. या सामन्यातील पापुआ न्यू गिनीच्या डावातील १६ वे षटक टाकण्यासाठी युगांडाकडून जोसेफ बागुमा गोलंदाजीसाठी आला होता. त्याने षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्राईकरवर उभा असलेला युगांडाचा फलंदाज जॉन कारिको क्रिजच्या पुढे जाताना दिसला. हे पाहून गोलंदाज जोसेफने यष्टीला चेंडू लावला आणि कारिकोला शून्यावर धावबाद केले.

https://www.instagram.com/reel/CZSLyAqlT1t/?utm_source=ig_web_copy_link

मंकडिंगवरून क्रिकेटपटू आले आमने सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने या मंकडिंग प्रसंगाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यानंतर या मंकडिंग प्रकरणावरून क्रिकेटपटू आमने सामने आले आहेत. माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने सोशल मीडियाद्वारे यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने हे चुकीचे आहे, असे म्हटले आहे.

परंतु दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) याने गोलंदाजाची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच क्रिजच्या बाहेर गेला तर गोलंदाज बिनधास्त त्याला मंकडिंग बाद करू शकतो. यामध्ये चुकीचे असे काहीही नाही. जर गोलंदाज चुकून क्रिजच्या रेषेच्या पुढे गेला, तर त्याला नो बॉल करार केले जाते. तसेच विरोधी संघाला फ्री हिट देत गोलंदाजाला एकप्रकारे शिक्षाही होते. मग फलंदाजासोबतही असेच व्हायला हवे. त्यानेही क्रिजच्या आतच उभे राहायला पाहिजे,’ असे शम्सीने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वार्षिक पुरस्कार जाहीर! स्टार्क-हेडचा ‘डबल धमाका’; पाहा संपूर्ण यादी

भारतीय महिलांचे पुन्हा ‘चकदे’! आशिया चषकात पटकावले कांस्यपदक

फलंदाजांचा घाम काढण्यासाठी श्रीलंकेत तयार होतोय ‘मिनी मलिंगा’, गोलंदाजी शैलीने आयसीसीलाही पाडलीय भुरळ

हेही पाहा-

काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये । World Cup Semi Final 2019

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---