क्रिकेट हा भारतातील सर्वात आवडता खेळ आहे. क्रिकेटने अनेक क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलले आहे. क्रिकेटमुळे काही खेळाडू रातोरात कोट्याधीश झाले आहेत. भारतीय संघात अनेक खेळाडू हे कोट्याधीश आहेत. त्याच सूचित सर्वात अव्वल आहे, तो भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. परंतु आलिशान घराच्या बाबतीत ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने विराट कोहलीलाही मागे पाडले आहे.
दोन विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या अष्टपैलू युवराज सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या सूचित त्याचे नाव आहे. क्रिकेटपटूंच्या सगळ्यात महागड्या फ्लॅटच्या बाबतीत युवराज सिंग हा विराट कोहलीपेक्षा पुढे आहे. युवराज सिंग व त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच हे दोघे सोबत मुंबईमधील वारली येथे ओमकार १९७३ टॉवर्समध्ये राहतात.
विराटपेक्षा महागडे आहे युवराजची अपार्टमेंट
माध्यमांतील वृत्तांनुसार, युवराज सिंगने हे अपार्टमेंट २०१३ साली ६४ कोटींमध्ये विकत घेतले होते. त्याच्या घरात एक सुंदर लिविंग रूम, वर्ल्ड क्लास मोनोक्रोम किचन आणि अनेक सुंदर खोल्या आहेत.
विराट कोहलीकडे मुंबईमधील याच अपार्टमध्ये आलिशान फ्लॅट आहे. विराट आणि त्याची पत्नी व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काने हा फ्लॅट २०१६ मध्ये त्यांच्या लग्न आगोदर घेतला होता. ओमकार १९७३ या अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट ३५ व्या फ्लोअरवर आहे. त्यांच्या फ्लॅटची किंमत ३४ कोटी रुपये आहे. हा फ्लॅट ७,१७१ स्क्वेअर फुटाचा आहे.
https://www.instagram.com/p/B_aUzKwD_zb/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/B4TPacLgOdn/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/B4f1UcIDwHH/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/B34GtveDo5k/?utm_source=ig_web_button_share_sheet
युवराज सिंगची अपार्टमेंट का एवढी खास आहे?
युवराज सिंग आणि हेजल कीचने नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले हो. ते तेव्हापासून हे जोडपे २९ व्या मजल्यावर १६,००० स्क्वेअर फुटाच्या सुंदर अशा फ्लॅटमध्ये राहतात. या फ्लॅटमधून पूर्ण मुंबई शहर आणि अरबी समुद्र दिसतो.
https://www.instagram.com/p/CFygigZDCVV/?utm_source=ig_web_button_share_sheet
बेडरूममध्ये सुंदर लायटिंग
नुकताच युवराज सिंगने आपले केस कापतानाचा एक विडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत युवराजने आपल्या बेडरूमची एक झलक दाखवली होती. बेडरूममध्ये डिम लाईट्स होत्या आणि त्या अतिशय सुंदर दिसत होत्या. रूममध्ये बेडसह काही सोफेही ठेवले आहेत. त्याची रूम ही गॅलरीला लागूनच आहे.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: कसोटीत ५ शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजाला नारळ, चाहत्यांकडून टिकेचा भडिमार
पुजाराच्या टिकाकारांना सचिनने सुनावली खरीखोटी; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच भारत कसोटीत यशस्वी’