भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरही त्याचा हा फॉर्म कायम होता. त्यामुळे भविष्यात तो सलामीसाठी सक्षम पर्याय असेल असे म्हटले जात आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने गिलच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.
भारतीय संघाला 2007 टी20 विश्वचषक व 2011 वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला युवराज नुकताच दृष्टीहीन क्रिकेटपटूंच्या विश्वचषक उद्घाटनासाठी हजर राहिला होता. या कार्यक्रमात त्याने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. पंजाबचाच असलेल्या शुबमन गिलबद्दल बोलताना युवराज म्हणाला,
“तो एक शानदार खेळाडू आहे. सध्या त्याच्या कामगिरीत सातत्य असून तो हे सातत्य असेच कायम ठेवेल. मी त्याला पुढील वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकात भारताचा सलामीवीर म्हणून पाहत आहे. त्या स्थानासाठी तो नक्कीच दावेदारी ठोकतोय. त्याची कामगिरी अशीच राहिल्यास पुढील दहा वर्षात तो यशाच्या शिखरावर असेल.”
गिलने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीज व झिम्बाब्वे दौऱ्यावरील वनडे मालिकांमध्ये तो मालिकावीर होता. तर, न्यूझीलंड दौऱ्यावरही एक अर्धशतकी खेळी त्याने केलेली.
याच कार्यक्रमावेळी युवराजने भारतीय संघाच्या निवड समितीबद्दल बोलण्यास नकार दिला. मात्र, क्रीडा प्रशासनात येण्याचा आपला मनसुबा असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला,
“मला एक क्रीडा किंवा क्रिकेट प्रशासक बनायला नक्की आवडेल. कोणत्याही मार्गाने क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देण्यासाठी मी तयार असतो.”
युवराज हा पंजाबमधील युवा क्रिकेटपटूंना वेळोवेळी मार्गदर्शन करतो. शुबमन गिलसह सध्या पंजाबचा कर्णधार असलेल्या अभिषेक शर्मा याच्या कारकिर्दीत त्याचा मोठा हात राहिला आहे.
(Yuvraj Singh Praised Shubman Gill)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट
बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट