वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 चा अंतिम सामन्यात भारतीय चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाला 5 धावांनी धूळ चारली. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सची ट्राॅफीवर कब्जा केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर संघाला जेव्हा ट्राॅफी देण्यात आले तेव्हा युवराज सिंगने राॅबीन उथप्पा सोबत असे काही केले ते पाहून तुम्ही पण अचंबित व्हाल.
भारतीय संघ विजेतेपद जिंकल्यानंतर, एक क्षण आला ज्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. खरं तर, जेव्हा भारतीय खेळाडू चषक घेऊन सेलिब्रेशन करत होते, त्याचवेळी क्रिकेटपटूंच्या मुलांनीही त्यांचे सेलिब्रेशनचे फोटो क्लिक केले होते. अशा स्थितीत फोटो क्लिक होत असताना रॉबिन उथप्पा कॅमेराच्या मध्यभागी आला. त्यामुळे युवीचा फोटो कॅमेऱ्यासमोर दिसत नव्हता. हे पाहून युवीने उथप्पाच्या कपाळावर चापट मारली आणि त्याला कॅमेऱ्यापासून दूर जाण्यास सांगितले, एकदा उथप्पाला त्याच्या कपाळावर कोणी मारले याचा धक्का बसला पण नंतर रॉबिन युवीला शांत राहिला आणि त्याला समजले की युवीने हे विनोद केले आहे. युवीने त्याला विनोदाने थप्पड मारली आणि उथप्पा पुन्हा युवराज सिंगपासून दूर गेला.
View this post on Instagram
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी गोलंदाजांनी जोरदार गोलंदाजी केली. संघाकडून अनुरीत सिंगने 4 षटकांत 3 बळी घेतले. विनय कुमार, नेगी आणि इरफान पठाण यांनी अनुक्रमे 1-1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने विरोधी संघाने दिलेले 157 धावांचे लक्ष्य 5 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून सहज गाठले. संघासाठी खालच्या क्रमाने फलंदाजी करताना इरफान पठाणने विजयी चौकार ठोकले. अंतिम सामन्यात संघासाठी 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 4 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 5 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. तर अंबाती रायडूने सर्वाधिक 50 धावा केल्या.
महत्तवाच्या बातम्या-
रिकी पाँटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनेल? सौरव गांगुलीनं केला खुलासा
‘तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा…, आम्ही आमची टीम पाकिस्तानला पाठवणार नाही’, माजी क्रिकेटरनी पीसीबीली खडसावलं
असा खेळाडू पुन्हा होणे नाही; युवराज सिंगने क्रिकेट करिअरमध्ये जिंकल्या चक्क इतक्या ट्राॅफ्या! एकदा पाहाच