भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने आज(10 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने 19 वर्षांच्या या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे त्याने या मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार अष्टपैलू कामगिरी करुन सर्वांची वाहवाही मिळवली. त्याचमुळे पुढे त्याला मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखले गेले.
मोठ्या स्पर्धेचा खेळाडू म्हणून नावाजलेल्या युवराजने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेतून केले होते. तसेच याच स्पर्धेतील केवळ दुसऱ्याच सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाविरुद्ध 80 चेंडूत 84 धावा करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
युवराजने आत्तापर्यंत खेळलेल्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये तब्बल 9 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. त्यातील 5 स्पर्धांमध्ये भारतीय संघाने विजेतेपदही पटकावले आहे. तसेच युवराजला यातील तीन स्पर्धांमध्ये युवराजला स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे.
यात 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2000 चा 19 वर्षांखालील भारतीय संघाने जिंकलेला पहिला विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे. त्याचबरोबर युवराजला 1996 ला झालेल्या 15 वर्षांखालील विश्वचषकातही मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
युवराजसाठी 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची आयसीसीची स्पर्धा ठरली. पण त्याला या स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध 53 धावांची खेळी केली होती. या व्यतिरिक्त त्याला जास्त काही करता आले नव्हते.
युवराज सिंगने खेळलेल्या आयसीसीच्या स्पर्धांचे अंतिम सामने –
चॅंपीयन्स ट्राॅफी- २०००, २००२(विजयी), २०१७
विश्वचषक (५० षटकं)- २००३, २०११ (विजयी)
विश्वचषक (२० षटकं)- २००७(विजयी), २०१४
विश्वचषक (अंडर १६)- १९९६ (विजयी)
विश्वचषक (अंडर १९)- २००० (विजयी)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बाPhoto Courtesy: Twitter/ BCCIतम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा
–शतक केले शिखरने विश्वविक्रम झाला भारताच्या नावावर!
–मोठी बातमी – युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा