भारतीय क्रिकेटमध्ये आपल्याला आश्चर्यचकित करणारे, हसवणारे, रडवणारे भरपूर प्रसंग पाहायला मिळतात. असाच एक किस्सा २००७ साली माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यात घडला होता. याबाबत आता युवराजने खुलासा केला आहे.
साल २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशने भारताला पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा मार्ग दाखवला. त्या काळात मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि संघातील काही सदस्यांमधील मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता युवीने त्यावेळेसचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
२२ यार्न पॉडकास्टशी संवाद साधताना युवराज सिंग म्हणाला, “मला भज्जी (हरभजन सिंग) आणि मी आठवतो. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर जवळजवळ आम्ही दोघे लपत लपत फिरत होतो. मला आठवते, आम्ही दोघे विचार करीत होतो की, पंजाबला नको जायला, खूप मार पडेल. आम्ही काही दिवस इंग्लंडमध्ये लपलो होतो आणि थोड्या दिवसांनी आम्ही घरी परतलो होतो.”
युवराज सिंग पुढे म्हणाला, “मला आठवते की त्यावेळी मी एक टी-शर्ट घातला होते. त्यावर लिहले होते की ‘प्ले हार्ड ऑर गो होम’ आणि मी हा शर्ट विमानामध्ये जाताना घातला होता. हरभजन सिंगने मला हा टी-शर्ट बदलायला सांगितला होता. कारण आम्ही स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर घरी जात होतो. त्यामुळे जर कोणी हा टी-शर्ट पहिला तर आमच्यावर हल्ला झाला असता.”
युवराज सिंग व हरभजन सिंगहे दोघे पुढे २००७च्या टी-२० विश्वचषक, २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी आणि २०११च्या विश्वचषक भारतीय संघाचा भाग होते. भारताने या तिन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या.
भारतीय संघासाठी या दोन्ही खेळाडूंनी उत्तम योगदान दिले आहे. युवराज सिंगच्या नावावर एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम आहे व त्याला ‘सिक्सर किंग’ही म्हटले जाते. युवराज सिंगने भारतीय संघासाठी वनडेमध्ये ३०४ सामने खेळाले आहेत व त्यात ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या आहेत. त्यात १४ शतक आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने गोलंदाजीतही १११ विकेट्स घेतल्या आहे.
हरभजन सिंगने आतापर्यंत भारतासाठी २३६ वनडे सामने खेळले आहे आणि त्यात त्याने २६९ विकेट्सही घेतले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने ५ वेळेस केला आहे.
महत्वाच्या बातम्या
भारत-श्रीलंका मालिकेसाठी निवड न झाल्याने ‘हा’ धुरंधर दु:खी, ठोकलीत २७ शतके
चूका सर्वांनी सांगितल्या, पण त्या सुधारण्यासाठी फक्त ‘त्यांनी’ मदत केली; विरूचा खुलासा
कोण आहे दिल्लीकर सिमरजीत सिंग, ज्याला भारतीय संघासोबत श्रीलंकेला जाण्याची मिळाली संधी?