आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक विश्वासू लोक असतात. क्रिकेट विश्वात ही अनेक असे मैत्रीचे संबंध दिसून आले आहे. युवराज सिंगने ही असेच त्याच्या विश्वासू खेळाडूचे नाव सांगितले आहे. युवराज सिंग रोहितच्या भरोश्यावर आपले जीवनाची बाजी लावण्यास तयार आहे.
युवराज सिंगला एका मुलाखतीदरम्यान जेव्हा अशा एका फलंदाजाचे नाव देण्यास सांगितले गेले होते, ज्याच्या फलंदाजीवर युवराज प्राणाची बाजी लावण्यास तयार असेल. या प्रश्नाचे उत्तर देताना युवराज सिंगने त्वरित रोहित शर्माचे नाव घेतले आहे.
रोहित बद्दल युवराजने दिली प्रतिक्रिया
स्पोर्टस्किडाला दिलेल्या मुलाखतीतील या प्रश्नाला उत्तर देताना युवराज सिंग म्हणाला की, “मी माझे आयुष्याच्या बाजीसाठी फलंदाजीमध्ये रोहित शर्माची निवड करेल.”
रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने क्रिकेटच्या कोट्यावधी चाहत्यांचे मन जिंकले आहेत. युवराज सिंगही रोहित शर्माचा मोठा चाहता आहे. रोहित शर्माने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण २२७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४९ च्या प्रभावी सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट ८८.९ आहे. त्याने आतापर्यंत २९ शतके आणि ४३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २६४ धावा आहे.
रोहित शर्माचा मेहुणा लागतो युवराज सिंग
अनेक लोकांना हे माहित असेल की युवराज सिंग हा भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा मेहुणा आहे. ६ वर्षांच्या डेटिंगनंतर रोहित आणि रितिकाचे डिसेंबर २०१५ मध्ये लग्न झाले. रितिका ही क्रिकेटपटू युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. ती युवीला राखी देखील बांधते.
भारतीय संघाचा ‘ सिक्सर किंग ‘ म्हणून ओळखला जणारा युवराज सिंगने १० जून २०१९ मध्ये क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली होती. त्याने अनेकदा आपल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघाला मोठया मोठया स्पर्धा जिंकून दिल्या आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात २००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मधून केली होती. त्याने ३ ऑक्टोबर २००० मध्ये केन्या विरुद्ध आपले पदार्पण केले होते. निवृत्तीनंतर तो समाज सेवा निगडित अनेक चांगले काम करीत आहे
महत्वाच्या बातम्या
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी
“श्रीलंका दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी देणे शक्य नाही”, द्रविडचे मोठे भाष्य